Kamindu Mendis Record Break Century in SL vs NZ: श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिसने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने खळबळ उडवली आहे. कामिंदू मेंडिसने ८ कसोटी सामन्यांच्या १३ डावात ५ शतके आणि ४ अर्धशतके झळकावली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपत आहे. कामिंदू मेंडिसने अर्धशतकाच्या जोरावर एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे आणि आता शतक झळकावत त्याने सर डॉन ब्रॅडमन याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातही कामिंदू मेंडिसने शतक झळकावले. त्याचे कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील हे ५वे शतक होते. यापूर्वी, कामिंदूने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ११४ धावांची शतकी खेळीही खेळली होती आणि दुसऱ्या सामन्यातही त्याने शतक झळकावले होते. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने १४७ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आणि जो रूटला मागे टाकून महान कसोटी फलंदाज डॉन ब्रॅडमन आणि जॉर्डन हॅडली यांची बरोबरी केली.

Dinesh Karthik reaction about Rishabh Pant and MS Dhoni
IND vs BAN : ऋषभ पंत कसोटीत धोनीपेक्षा सरस आहे का? दिनेश कार्तिकने दिले उत्तर, चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
IND vs BAN R Ashwin wife Prithi interview video
IND vs BAN : ‘मुलींना काय गिफ्ट देणार…’, पत्नीच्या ‘फिरकी’वर रविचंद्रन अश्विन ‘क्लीन बोल्ड’, BCCI ने शेअर केला मुलाखतीचा VIDEO
Rohit Sharma Became First Captain to Complete 1000 Runs in 2024 IND vs BAN 1st Test
IND vs BAN: रोहित शर्माने चेन्नई कसोटीत केला मोठा पराक्रम; २०२४ मध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार
Travis Head Broke Rohit Sharma Record in ENG vs AUS ODI
ENG vs AUS: ट्रेव्हिस हेडने विक्रमी खेळीसह मोडला रोहित शर्माचा वनडेमधील मोठा विक्रम, ‘बॅझबॉल’चाही उडवला धुव्वा
Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa
कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?
Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
ENG vs SL 3rd Test Highlights Pathum Nissanka century r
ENG vs SL 3rd Test : पाथुम निसांकांच्या खणखणीत शतकासह श्रीलंकेने संपवला इंग्लंडमधला विजयाचा दुष्काळ

हेही वाचा – IND vs BAN: विराट कोहली २२ वर्षीय नेट बॉलरकडून सलग दोन वेळा बाद; भेदक गोलंदाजी पाहून विराटने विचारलं, “अरे तू किती…”

कमिंदू मेंडिसने कसोटी क्रिकेटमधील आपले ५वे शतक केवळ १३ डावात पूर्ण केले आणि डॉन ब्रॅडमनसह जॉर्ज हेडलीची बरोबरी केली. ब्रॅडमन यांनी १९३० साली १३ डावांत ५ शतके ठोकण्याचा पराक्रम केला होता, तर हेडलीने १९३१ मध्ये केवळ १३ डावांत हा पराक्रम केला होता. आता कामिंदू मेंडिसने २०२४ मध्ये या दोन्ही महान फलंदाजांची बरोबरी केली आणि १३ डावांमध्ये त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ५वे शतक झळकावले.

हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्माचा दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकत चकित करणारा निर्णय, ९ वर्षांत पहिल्यांदाच घडली अशी घटना

कामिंदू मेंडिसने दुसऱ्या कसोटीत नाबाद १८२ धावा केल्या. यासह त्याने १३४ डावांमध्ये ५ शतके झळकावत एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५ कसोटी शतके झळकावणारा तो आशियामधील पहिला फलंदाज ठरला आहे. आशियामध्ये सर्वात जलद ५ कसोटी शतकं करण्याच्या बाबतीत त्याने पाकिस्तानचा फलंदाज फवाद आलम याचा विक्रम मोडला आहे. याबरोबरच मेंडिसने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे.

हेही वाचा – IND vs BAN: बांगलादेश संघाच्या चाहत्याला कानपूर स्टेडियममध्ये मारहाण, शिवीगाळ करून जमावाने हल्ला केल्याचा आरोप

सर्वात कमी डावात ५ कसोटी शतकं झळकावणारे फलंदाज

१० – एव्हर्टन वीक्स (१९४८)
१२ – हर्बर्ट सटक्लिफ (१९२५)
१२ – नील हार्वे (१९५०)
१३ – डॉन ब्रॅडमन (१९३०)
१३ – जॉर्ज हॅडली (१९३१)
१३ – कामिंदू मेंडिस (२०२४)

२०२४ मध्ये सर्वाधिक कसोटी शतके२०२४ मध्ये सर्वाधिक कसोटी शतके

जो रूट – ५
ऑली पोप – ३
शुभमन गिल- ३
केन विल्यमसन- ३

कामिंदू मेंडिसने जो रूटला टाकले मागे

२०२४ मध्ये कामिंदू कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. त्याने या वर्षात आतापर्यंत १२ कसोटी डावांमध्ये ३६५ धावा केल्या असून यामध्ये ५ शतकांचा समावेश आहे. या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध ५वे शतक झळकावल्यानंतर, त्याने जो रूटला मागे टाकले आहे. ज्याने २०२४ मध्ये आतापर्यंत २० डावांमध्ये ९८६ धावा केल्या आहेत आणि एकूण ४ शतके झळकावली आहेत. कामिंदूची यंदा कसोटीमध्ये सरासरी ८६.५ आहे. यानंतर ऑली पोप, शुबमन गिल आणि केन विल्यमसन यांनी २०२४ मध्ये कसोटीत प्रत्येकी सर्वाधिक ३ शतके झळकावली आहेत.