Harbhajan Singh Kamran Akmal Video Viral : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान शनिवारी पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर कामरान अकमलचा सामना भारतीय दिग्गज हरभजन सिंगशी झाला. दोघेही बर्मिंघममध्ये एकमेकांशी बोलताना दिसले, त्यानंतर पुन्हा एकदा अर्शदीप सिंगवरील कमेंटचा मुद्दा समोर आला. वास्तविक, कामरानने टी-२० वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान अर्शदीप सिंगवर वादग्रस्त टिप्पणी केली होती. ज्यावर हरभजनने पाकिस्तानी दिग्गजांना फटकारले होते. आता दोघे एका सामन्यात आमनेसामने आले होते, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कामरान भज्जीला समजावत राहिला –

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेतील आहे. दोघेही त्यांच्या आधीच्या वादाबद्दल बोलत असल्याचा अंदाज बांधला जात आहे. व्हिडिओमध्ये पाकिस्तानी खेळाडू भज्जीला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत असताना हरभजन सिंग खूपच आक्रमक दिसत आहे. मात्र, दोघांमध्ये काय संभाषण सुरू आहे, हे कोणालाच माहीत नाही. दोघेही त्यांच्या आधीच्या वादाबद्दल बोलत असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

Pakistan test captain Shan Masood on Virat Kohli
VIDEO : ‘विराटपेक्षा ‘या’ २४ वर्षीय खेळाडूचा रेकॉर्ड चांगला…’, पाकिस्तानच्या कसोटी कर्णधाराचे वक्तव्य
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
India vs Bangladesh 2nd Test from today sport news
वर्चस्व राखण्याचे भारताचे लक्ष्य! बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून; सलग १८व्या मालिका विजयासाठी प्रयत्नशील
Dinesh Karthik reaction about Rishabh Pant and MS Dhoni
IND vs BAN : ऋषभ पंत कसोटीत धोनीपेक्षा सरस आहे का? दिनेश कार्तिकने दिले उत्तर, चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन
India beat Bangladesh by 280 Runs in 1st Test Ravichandran Ashwin fifer Rishabh Pant Shubman Gill Centuries
IND vs BAN: भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय, गेल्या ९२ वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट
Test cricket match against Bangladesh India hold on to the match
भारताची सामन्यावर पकड; पंत, गिलच्या शतकानंतर अश्विनची फिरकी प्रभावी; बांगलादेश ४ बाद १५८
IND vs BAN Shubman Gill fifth Test century against Bangladesh
IND vs BAN : शुबमनने शतक झळकावत भारताचा बाबर म्हणणाऱ्यांची बोलती केली बंद, भारताने बांगलादेशला दिले ५१५ धावांचे लक्ष्य
Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa
कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

वास्तविक, टी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केल्यावर संपूर्ण वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला. त्या सामन्यात शानदार गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीप सिंगची खिल्ली उडवताना कामरान अकमलने संपूर्ण शीख धर्माची खिल्ली उडवली होती. त्यावर हरभजन सिंगने कामरान अकमलला खडे बोल सुनावले होते.

हेही वाचा – ‘या’ माजी खेळाडूला भारतरत्न द्या, टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सुनील गावसकरांची सरकारकडे मागणी

हरभजनने कामरानला खडसावले होते –

हरभजन सिंग म्हणाला होता, “कामरान अकमलने हे समजून घेतले पाहिजे की, कोणाच्याही धर्माबद्दल काहीही बोलण्याची आणि त्याची खिल्ली उडवण्याची गरज नाही. मला कामरान अकमलला विचारायचे आहे की त्याला शिखांचा इतिहास माहित आहे का, शीख कोण आहेत आणि ते कोण आहेत. तुमच्या समाजाला, तुमच्या माता-भगिनींना वाचवण्यासाठी शिखांनी जे काही काम केले आहे. हे तुमच्या पूर्वजांना विचारा, शीख लोक रात्री १२ वाजता मुघलांवर हल्ला करायचे आणि तुमच्या माता-भगिनींना सोडवून आणायचे, त्यामुळे फालतू बोलणे बंद करा.”

हेही वाचा – WCL 2024 : ४४व्या वर्षी ख्रिस गेलचा झंझावात; चौकार-षटकारांनी पुन्हा जिंकली चाहत्यांची मनं, VIDEO व्हायरल

कामरान अकमलने मागितली होती माफी –

माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने खडलावल्यानंतर कामरान अकमलने जाहीरपणे माफी मागितली होती. कामरान अकमलने नंतर त्याच्या शब्दाबद्दल माफी मागताना म्हणाला, “मला माझ्या अलीकडील टिप्पण्यांबद्दल मनापासून खेद आहे आणि मी भज्जीची मनापासून माफी मागतो. माझे शब्द अयोग्य आणि शीख समुदायाचा अपमान करणारे होते. मला जगभरातील शीख लोकांबद्दल अत्यंत आदर आहे आणि कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मला खरच माफ करा.”