Kamran Ghulam Test Debut Century: मुलतानमध्ये पाकिस्तान वि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कसोटी संघात धक्कादायक बदल केले गेले. पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह या खेळाडूंना कसोटी संघातून वगळण्यात आले. त्याऐवजी इतर नव्या खेळाडूंना संध देण्यात आली आहे. त्यापैकी बाबर आझमच्या जागी संघात संधी दिलेल्या पदार्पणवीर कामरान गुलाम याने शतक झळकावले आहे. कामरानने १९२ चेंडूत चौकारासह १०२ धावा करत आपले पहिले कसोटी शतक झळकावत इतिहास घडवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कामरानने पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे. कामरानचा हा पहिलाच कसोटी सामना असून त्याने पहिल्या डावातच शतक झळकावून इतिहास घडवला आहे. ५ वर्षांनंतर पाकिस्तानच्या एखाद्या फलंदाजाने पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. कामरान गुलामचे हे शतकही खास आहे कारण बाबर आझमच्या जागी या फलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली.

हेही वाचा – Rohit Sharma on Mohammed Shami: “शमीला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणं शक्य नाही…”, रोहित शर्माने मोहम्मद शमीबद्दल केलं मोठं वक्तव्य, कर्णधार नेमकं काय म्हणाला?

मुलतान कसोटीची सुरूवात पाकिस्तानसाठी फारशी चांगली झाली नाही. संघाने १० षटकांत अब्दुल्ला शफीक आणि शान मसूद यांच्या विकेट्स गमावल्या. दबावाच्या वातावरणात कामरान गुलामने क्रीझवर पाऊल ठेवले. या उजव्या हाताच्या फलंदाजाने १५व्या चेंडूवरच षटकार ठोकून आपला फॉर्म दाखवून दिला. यानंतर गुलामने १०४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तत्पूर्वी, या खेळाडूने सॅम अयुबबरोबर तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. सॅम अयुब ७७ धावांची खेळी करत बाद झाला. त्याची विकेट पडल्यानंतर पाकिस्तानला सौद शकीलच्या रूपाने मोठा धक्का बसला पण कामरान क्रीजवरच पाय घट्ट रोवून उभा होता.

हेही वाचा – IND vs NZ Live Streaming: भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका मोफत कुठे पाहता येणार? जाणून घ्या चॅनेल आणि सामन्याची वेळ

पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा कामरान गुलाम हा १३वा पाकिस्तानी फलंदाज आहे. तसेच, पाकिस्तानमध्ये ही कामगिरी करणारा तो ११वा खेळाडू आहे. इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा तो पहिला पाकिस्तानी खेळाडू आहे. तर मुलतानच्या मैदानावर २३ वर्षांनंतर एखाद्या फलंदाजाने पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले आहे. तर कामरान अकमल (२९ वर्षे) हा अबिद अलीनंतर पदार्पणामध्ये कसोटी शतक झळकावणारा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. यापूर्वी २०१९ मध्ये आबिद अलीने पाकिस्तानसाठी ही कामगिरी केली होती.

हेही वाचा – Ranji Trophy: कोण आहे गुरजपनीत सिंह? विराट कोहलीच्या सल्ल्याने चेतेश्वर पुजाराला रणजी ट्रॉफीमध्ये केलं आऊट, ठरला तमिळनाडूच्या विजयाचा हिरो

कामरान गुलामने २०२३ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. त्या सामन्यात हरिस सोहेल जखमी झाला होता. पण कामरान गुलामला ना फलंदाजीची संधी मिळाली ना गोलंदाजीची. यानंतर हा खेळाडू पाकिस्तानी संघातून आत-बाहेर होत राहिला आणि त्याला संधी मिळाली नाही. पण आता कसोटी पदार्पणाची संधी मिळताच त्या संधीचं सोनं करून दाखवलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamran ghulam slams first test century becomes pakistan 2nd oldest man on debut pak vs eng multan test bdg