करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. त्यामुळे सध्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर हा डान्सचे व्हिडीओ अपलोड करून घरच्यांसोबत वेळ घालवत आहे. डेव्हिड वॉर्नरने काही दिवसांपूर्वीच टिकटॉक अकाऊंट सुरु केलं आहे. तो आपले व्हिडीओ सध्या तिथे पोस्ट करत आहे. वॉर्नरने आधी कतरिना कैफच्या ‘शीला की जवानी’ गाण्यावर डान्स केला, त्यानंतर वॉर्नरचा सहकुटुंब, सहपरिवार डान्स व्हिडीओ फॅन्सच्या पसंतीस उतरला होता. पण यावेळी वॉर्नर चर्चेत येण्याचे कारण डान्स नसून काहीसं वेगळं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पाकिस्तानी क्रिकेटपटूला दणका! मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली तीन वर्षांची बंदी

सनरायझर्स हैदराबाद संघाचा माजी कर्णधार भुवनेश्वर कुमार याच्याशी चॅट करून झाल्यावर नुकतेच डेव्हिड वॉर्नरने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याच्याशी लाईव्ह चॅट द्वारे संपर्क साधला. या दोघांनी क्रिकेटविषयक अनेक गप्पा मारल्या. त्यात क्रिकेटमध्ये आजी-माजी खेळाडूंमध्ये सध्याच्या घडीला आणि सर्वकालीन असे दोन्ही प्रकारचे सर्वोत्तम फलंदाज कोण याची चर्चा रंगली.

VIDEO : युवी उजव्या हाताने फलंदाजी करत असता तर…

याबाबत उत्तर देताना वॉर्नर आणि विल्यमसन दोघांचे विराट कोहली हा सध्याच्या घडीला सर्वोत्तम असल्यावर एकमत झाले.
विल्यमसन म्हणाला की तसे अनेक चांगले फलंदाज आहेत त्यामुळे एक फलंदाज निवडणे कठीण आहे. एबी खूप चांगला फलंदाज आहे पण सध्या तो फक्त फ्रांचाईस क्रिकेटचं खेळतो. कोहली हा सध्या सर्वोत्तम आहे. तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो धावा करतो. त्याची फलंदाजी पाहायला मज्जा येते. तसेच त्याच्याविरुद्ध खेळतानाही छान आव्हानात्मक वाटते. कारण त्याने अनेक गिरीशिखरे पादाक्रांत करून ठेवली आहेत”, असे विल्यमसन म्हणाला.

VIDEO : वॉर्नरच्या प्रश्नावर भुवनेश्वर कुमारचं ‘झक्कास’ उत्तर

त्यावर उत्तर देताना वॉर्नरने कोहलीबरोबरच केन विल्यमसन आणि स्टीव्ह स्मिथ हेदेखील सर्वोत्तम असल्याचे म्हटले. त्यानंतर वॉर्नरने विल्यमसन त्याचा आवडता सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू कोण असं विचारलं. त्यासह “मला तरी आफ्रिकेचा जॅक कालीस आवडतो. फलंदाजीत त्याने अनेक विक्रम मोडले आहेत आणि गोलंदाजी करत ३०० बळी देखील आपल्या नावे केले आहेत. त्याशिवाय २०० झेलदेखील टिपले आहेत”, असे वॉर्नर म्हणाला. विल्यमसनने मात्र वेगळे उत्तर दिले. तो म्हणाला की रिकी पोंटिंग, राहुल द्रविड आणि कुमार संगाकारा हे माझे ३ आवडते सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू आहेत.