केन विल्यमसननंतर हेन्री निकोल्सने वेलिंग्टनमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत द्विशतक ठोकून इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटच्या एका डावात द्विशतक झळकावणारी विल्यमसन आणि निकोल्स ही जगातील १८वी जोडी ठरली आहे. केन विल्यमसन २१५ धावांवर बाद झाला, तर हेन्री निकोल्सने नाबाद २०० धावा केल्या. या दोन खेळाडूंच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिला डाव ४ गडी गमावून ५८० धावांवर घोषित केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याआधी जागतिक क्रिकेटमध्ये, एकाच डावात दोन फलंदाजांनी द्विशतक झळकावने एकूण १७ वेळा घडले आहे. या यादीत समाविष्ट होणारी न्यूझीलंडची ही पहिली जोडी आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी हा पराक्रम सर्वाधिक ५ वेळा केला आहे. त्याचबरोबर श्रीलंकेने चारवेळा आणि पाकिस्तानने चारवेळा अशी कामगिरी केली आहे.

पॉन्सफोर्ड (२६६) आणि ब्रॅडमन (२४४) ही कसोटी क्रिकेटच्या एका डावात दोन द्विशतके झळकावणारी जगातील पहिली जोडी होती, ज्यांनी १९३४ मध्ये इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. त्याचबरोबर या यादीत भारताची एकमेव जोडी आहे. गौतम गंभीर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतके झळकावली होती.

हेही वाचा – IND vs AUS 1st ODI: ‘जास्त उड्या नको मारु…’, शानदार गोलंदाजी करणाऱ्या सिराजला मोहम्मद शमीने दिला महत्वाचा सल्ला

एका डावात दोन द्विशतके झळकावणाऱ्या जोड्या –

१.पॉन्सफोर्ड (२६६) आणि ब्रॅडमन (२४४) – विरुद्ध इंग्लंड, १९३४
२.ब्रॅडमन (२३४) आणि बार्न्स (२३४) – विरुद्ध इंग्लंड, १९४६
३.सोबर्स (३६५) आणि हंट (२६०) – विरुद्ध पाकिस्तान, १९५८

४.लॉरी (२१०) आणि सिम्पसन (२०१) – विरुद्ध , १९६५

५.जावेद मियाँदाद (२८०) आणि मुदस्सर नजर (२३१) – विरुद्ध भारत, १९८३
६.गॅटिंग (२०७) आणि फॉलर (२०१) – विरुद्ध भारत, १९८५
७.कासिम उमर (२०६) आणि जावेद मियांदाद (२०३) – विरुद्ध श्रीलंका, १९८५

८.जयसूर्या (३४०) आणि महानामा (२२५) – विरुद्ध भारत, १९९७

९.एजाज अहमद (२११) आणि इंझमाम-उल-हक (२००) – विरुद्ध श्रीलंका, १९९
१०.संगकारा (२७०) आणि अटापट्टू (२४९) – विरुद्ध झिम्बाब्वे, 2004
११.हिंड्स (२१३) आणि चंद्रपॉल (२०३) – विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २००५

१२.जयवर्धने (३७४) आणि संगकारा (२८७) – विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २००६

१३.स्मिथ (२३२) आणि मॅकेन्झी (२२६) – विरुद्ध बांगलादेश, २००८

१४.गंभीर (२०६) आणि लक्ष्मण (२००) – विरुद्ध ऑस्ट्रेलिया २००८
१५.जयवर्धने (२४०) आणि समरवीरा (२३१) – विरुद्ध पाकिस्तान २००९
१६.पाँटिंग (२२१) आणि क्लार्क (२१०) – विरुद्ध भारत, २०१२
१७. लाबुशेन (२०४) आणि स्मिथ (२००) – विरुद्ध भाजपा, २०२२
१८.विल्यमसन (२१५) आणि निकोल्स (२००*) – विरुद्ध श्रीलंका, २०२३

हेही वाचा – वन डे क्रिकेट कंटाळवाणं का होतं आहे ? सचिन तेंडुलकरने कारण, आवड निर्माण करण्यासाठी दिल्या ‘या’ सूचना

न्यूझीलंडच्या डावाबद्दल बोलायचे झाले, तर केन विल्यमसन आणि हेन्री निकोल्स यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ३६३ धावांची विक्रमी भागीदारी झाली. विल्यमसन आणि निकोल्स यांच्यातील कसोटी क्रिकेटमधील ही दुसरी ३०० पेक्षा जास्त भागीदारी आहे. आता एकापेक्षा जास्त वेळा अशी कामगिरी करणारी न्यूझीलंडची पहिली जोडी बनली आहे. यासह, ही न्यूझीलंडची कोणत्याही विकेटसाठी ५वी सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी विल्यमसन आणि निकोल्स यांनी २०२१ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ३६९ धावांची भागीदारी केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kane williamson and henry nicholas create history for nz by scoring double centuries in a single test innings vbm