Kane Williamson has again become number one in the ICC Test batting rankings: हेडिंग्ले कसोटी सामना संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. त्यानुसार टॉप-५ स्थानांमध्ये मोठा बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने आपल्याच संघातील अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे.
इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात शानदार कामगिरी करत ट्रॅव्हिस हेडने दोन स्थानांनी झेप घेतली आहे. तो आता न्यूझीलंडचा अनुभवी केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर आहे. २९ वर्षीय खेळाडूने अॅशेसमध्ये ४४.३३च्या सरासरीने २६६ धावा केल्या आहे, तो इंग्लिश गोलंदाजांना सतत त्रास देत आहे. या क्रमवारीत पुन्हा एकदा केन विल्यमसन नंबर वनच्या खुर्चीवर विराजमान झाला आहे. गेल्या सुमारे चार महिन्यांपासून तो कसोटी खेळला नाही, पण त्यानंतरही गेल्या आठवड्यात त्याने पहिल्या क्रमांकाची खुर्ची काबीज केली होती, जी अजूनही अबाधित आहे. त्याचे ८८३ गुण आहेत.
बाबर आझमचा फायदा, स्मिथचा तोटा –
फलंदाजांच्या यादीत हेडच्या वाटचालीमुळे फलंदाजी क्रमवारीत आणखी एक फेरबदल झाला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तीन स्थानांनी पुढे तिसऱ्या स्थानावर आला आहे. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथ दोन स्थानांच्या नुकसानासह चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. याशिवाय मार्नस लबुशेन पाचव्या आणि जो रूट सहाव्या स्थानावर आला आहे.
हेही वाचा – DD vs NRK: TNPL 2023 मध्ये तीन खेळाडूंकडून एक झेल सुटल्याने चाहत्यांना आली पाकिस्तान संघाची आठवण, पाहा VIDEO
बेन स्टोक्स आणि हॅरी ब्रूकलाही झाला फायदा –
लीड्समध्ये तीन गडी राखून विजय मिळविल्यानंतर इंग्लंडसाठी चांगली बातमी आहे. युवा खेळाडू हॅरी ब्रूकने दुसऱ्या डावात शानदार अर्धशतक झळकावल्यानंतर कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट क्रमवारीसह १२व्या स्थानावर पोहोचला आहे त्याचबरोबर कर्णधार बेन स्टोक्स पाच स्थानांनी पुढे सरकत १८व्या स्थानावर पोहोचला आहे.
आयसीसी फलंदाजांची कसोटी क्रमवारी –
१. केन विल्यमसन: ८८३
२. ट्रॅव्हिस हेड: ८७४
३. बाबर आझम : ८६२
४. स्टीव्ह स्मिथ: ८५५
५. मार्नस लॅबुशेन: ८४९
६. जो रूट: ८४२
७. उस्मान ख्वाजा: ८२४
८. डॅरिल मिशेल: ७९२
९. दिमुथ करुणारत्ने: ७८०
१०. ऋषभ पंत: ७५८