Kane Williamson says Even though it was a used pitch it was still very good: बुधवारी पार पडलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला. हा सामना जिंकून टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. सामन्यात वापरण्यात आलेल्या खेळपट्टीबाबत बरीच चर्चा झाली आणि खेळपट्टी बदलण्याबाबतही चर्चा झाली. पण न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने वानखेडेची खेळपट्टीवरुन निर्माण झालेल्या वादानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केन विल्यमसनची खेळपट्टीबाबत प्रतिक्रिया –

किवी कर्णधाराने कबूल केले की, वापरण्यात आल्यानंतरही ही खेळपट्टी खूप चांगली होती. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना केन विल्यमसन म्हणाला, “जरी ती वापरलेली खेळपट्टी असली, तरीही खेळपट्टी खूप चांगली होती आणि भारतीय खेळाडूंनी फलंदाजी करताना त्याचा पुरेपूर फायदा घेतला. त्याचवेळी संध्याकाळपर्यंत परिस्थिती बदलल्याचे पाहायला मिळाले. पण तरीही आम्ही खरोखरच चांगला खेळ केला.” उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव झाला असला तरी संघाने शेवटपर्यंत हार मानली नाही आणि विल्यमसनला आपल्या संघाचा खूप अभिमान आहे.

न्यूझीलंडच्या न्यूज वेबसाइटने या वादावर आयसीसीच्या विधानावर प्रकाश टाकताना लिहिले आहे की, ‘आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण स्पर्धेत खेळपट्ट्या बदलण्यात आल्या आहेत आणि उपांत्य फेरीदरम्यान झालेल्या बदलांची त्यांना माहिती होती. . खेळपट्टीतील बदल घरच्या संघाच्या फायद्यासाठी केला जात आहे.’

हेही वाचा – VIDEO: माजी पाकिस्तानी खेळाडूचा रोहित शर्मावर नाणेफेकीत फसवणूक केल्याचा आरोप; म्हणाला, ‘जाणीवपूर्वक नाणे…’

सामन्याबद्दल बोलायचे तर, भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत चार गडी गमावून ३९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ४८.५ षटकांत ३२७ धावांवर गारद झाला. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ११७ धावा केल्या. तसेच श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी केली. शुबमन गिलने नाबाद ८० धावांचे योगदान दिले. कर्णधार रोहितने ४७ आणि लोकेश राहुलने नाबाद ३९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन आणि ट्रेंट बोल्टने एक विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kane williamson says even though it was a used pitch it was still very good in wankhede stadium mumbai vbm