New Zealand Vs Sri lanka Test Match Video : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना क्राइस्टचर्चमध्ये खेळवण्यात आला. हा सामना भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या सामन्यापेक्षाही अधिक रंगतदार झाला. न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसनने या सामन्यातील हिरो ठरला. कारण शेवटच्या षटकात त्याने चौकार मारला. न्यूझीलंडने हा सामना २ विकेट्स राखून जिंकला. या विजयानंतर न्यूझीलंडने आनंद व्यक्त केलाच. पण टीम इंडियाला न्यूझीलंडच्या विजयाचा अधिक फायदा झाला.

कारण न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केल्यानं डब्ल्यूटीसी फायनलमध्ये टीम इंडियाचा प्रवेश निश्चित झाला. विल्यमसन भारतासाठीही हिरो ठरला. कारण १२१ धावांच्या शतकी खेळीमुळं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचं स्थान पक्क झालं. न्यूझीलंडला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशीच्या शेवटच्या षटकात सामना जिंकण्यासाठी ८ धावांची आवश्यकत होती. त्यावेळी पिचवर सेट फलंदाज केन विल्यमसन होता. त्या शेवटच्या षटकात नेमंक काय झालं? याबाबत जाणून घेऊयात.

IND vs NZ India suffered their first-ever home series whitewash in a three-match Test series, losing the third Test at the Wankhede Stadium in Mumbai by 25 runs on Sunday
IND vs NZ : टीम इंडियाचा सलग तिसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव! न्यूझीलंडने व्हाइट वॉश करत भारतात घडवला इतिहास
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
IND A vs AUS A Ishan Kishan in Trouble as India A team accused of ball tampering
IND A vs AUS A : धक्कादायक! ऑस्ट्रेलियात टीम इंडियावर ‘बॉल टॅम्परिंग’चा आरोप, पंचांशी वाद घातल्याने इशान किशन अडचणीत
Stuart Binny scoring 31 runs in last over against UAE video viral
Stuart Binny : स्टुअर्ट बिन्नीने शेवटच्या षटकात पाडला ३१ धावांचा पाऊस, तरीही यूएईविरुद्ध भारताला पत्करावा लागला पराभव, पाहा VIDEO
Rishabh Pant Shubman Gill Hits Fiery Fifty against New Zealand as India Got Good Start IND vs NZ 3rd Test Day 2
IND vs NZ: भारतीय संघाची टी-२० स्टाईल सुरूवात, पंत-गिलची झंझावाती अर्धशतकं; किवी गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Sai Sudarshan century against Australia A
Sai Sudarshan : आयपीएलमध्ये रिटेन करताच साई सुदर्शनचा शतकी नजराणा, ऑस्ट्रेलियात साकारली दमदार खेळी
Virat Kohli run out after Matt Henry direct hit video viral IND vs NZ 3rd Test
Virat Kohli : विराट कोहलीचा आत्मघातकी रनआऊट, रनमशीनचा वेग कमी पडला अन्… पाहा VIDEO
IND vs NZ 3rd test Washington Sundar Bowled Hattrick against Rachin Ravindra
IND vs NZ : वॉशिंग्टन सुंदरने रचिन रवींद्रविरुद्ध नोंदवली हॅटट्रिक! सलग तिसऱ्या डावात उडवला त्रिफळा, VIDEO होतोय व्हायरल

नक्की वाचा – WTC 2023: पत्रकार परिषदेत रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला, “WTC फायनलच्या तयारीसाठी आयपीएलमध्ये…”

इथे पाहा व्हिडीओ

शेवटच्या षटकात केन विल्यमसनने केली सावध खेळी

क्राइस्टचर्च कसोटीचा शेवटचं षटक श्रीलंकेकडून असिता फर्नांडो टाकत होता. तर न्यूझीलंडकडून केन विल्यमसन स्ट्राईकवर होता. षटकातील पहिल्या चेंडूवर केनने दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला होता. पण धावताना केनचा पाय सटकल्याने त्याला एकच धावा काढता आली. त्यानंतर मॅट हेनरीने दुसऱ्या चेंडूवर केनला स्ट्राईक दिली. तिसऱ्या चेंडूवर केनने पुन्हा दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी मॅट हेनरी बाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडला विजयासाठी ३ चेंडूत ५ धावांची गरज होती. असिताच्या चौथ्या चेंडूवर केनने चौकार मारला. त्यानंर किवी टीमला फक्त एका धावेची आवश्यकता होती.

श्रीलंकेच्या गोलंदाजाने पाचवा चेंडू बाऊंसर टाकला. पण केनला तो चेंडू खेळता आला नाही. तसंच शेवटचा चेंडूही बाऊंसर टाकण्यात आला आणि त्या चेंडूवरही केनला फटका मारता आला नाही. पण केनने मिस झालेल्या चेंडूवर धाव काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विकेटकीपरने नील वैगनरला धावबाद करण्याच्या प्रयत्न केला. पण नील बाद झाला नाही. त्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूने केनच्या दुसऱ्या एंडवर चेंडू फेकला आणि तो चेंडू थेट स्टंपवर लागला. पण त्याआधीच केन डाइव मारून क्रीजवर पोहोचला होता. शेवटी न्यूझीलंडने २ विकेट्सने हा सामना जिंकून श्रीलंकेचा पराभव केला.