इंग्लंडला पहिला विश्वचषक जिंकवून देण्याच मोलाचा वाटा उचलणाऱ्या बेन स्टोक्सने New Zealander of the Year हा पुरस्कार नाकारला आहे. आपल्यापेक्षा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन या पुरस्काराचा खरा मानकरी असल्याचं स्टोक्सने म्हटलं आहे. बेन स्टोक्स सध्या इंग्लंडचं प्रतिनिधीत्व करत असला तरीही त्याचा जन्म न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथे झाला आहे. अंतिम फेरीत त्याने केलेल्या कामगिरीनंतर त्याला New Zealander of the Year पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलं होतं.

”या पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्याचा मला आनंद आहे. पण माझ्यापेक्षा अनेक चांगले खेळाडू न्यूझीलंडमध्ये आहेत. त्यांनीही देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्यामुळे मी या नामांकनातून माघार घेत आहे.” स्टोक्सने प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आपली भूमिका जाहीर केली. अंतिम फेरीत बेन स्टोक्सने ९८ चेंडूत ८४ धावा केल्या होत्या. याचसोबत सुपरओव्हरमध्येही त्याने ८ धावा काढल्या होत्या.

विश्वचषक स्पर्धेतही बेन स्टोक्सने आश्वासक फलंदाजी करत १० डावांत ४६५ धावा केल्या आहेत.

Story img Loader