विराट कोहली आणि बाबर आझम हे सध्याच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम स्टायलिश खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूं परफेक्ट टायमिंगसह कव्हर ड्राईव्ह ज्या पद्धतीने लगावतात, ते पाहून केवळ चाहतेच नाही तर माजी दिग्गज देखील खूश होतात. दोन्ही खेळाडू यावेळी त्यांच्या सर्वोत्तम टायमिंगसह शॉट्स लगावण्यासाठी ओळखले जातात. विशेषत: त्यांना कव्हर ड्राईव्ह शॉट लगावताना पाहणे खूप आनंददायी आहे. हेच कारण आहे की सोशल मीडियावर नेहमीच जास्त चर्चा होते की, कव्हर ड्राईव्ह कोण चांगला लगावतो, कोहली की बाबर.
अशा परिस्थितीत न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू केन विल्यमसनने त्याला कोणाचा कव्हर ड्राईव्ह आवडतो ते सांगितले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जेव्हा विल्यमसनला हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने आपली निवड सांगितली. खरं तर, विल्यमसनला विचारण्यात आले की कोहली आणि बाबर यांच्यामध्ये कोण कव्हर ड्राइव्ह अधिक चांगला लगावतो, तुमचा आवडता कोण आहे, ज्याला न्यूझीलंडच्या कर्णधाराने उत्तर दिले आणि सांगितले की त्याला कोहलीचा कव्हर ड्राइव्ह अधिक आवडतो. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा – भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन महिला संघ जाहीर: ‘या’ दोन नवीन खेळाडूंना मिळाली संधी
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन वैद्यकीय कारणांमुळे भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात खेळत नाही. विल्यमसनची डॉक्टरांची नियोजित भेट आहे. विल्यमसनच्या जागी मार्क चॅपमनचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्या अनुपस्थितीत वरिष्ठ वेगवान गोलंदाज टीम साऊथी संघाची धुरा सांभाळत आहे. ऑकलंडमध्ये एकदिवसीय मालिकेसाठी सर्व खेळाडू एकत्र आल्यावर विल्यमसन बुधवारी संघात सामील होईल. पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी ईडन पार्कवर होणार आहे.