भारतीय क्रिकेट संघाला १९८३ साली पहिला विश्वचषक जिंकून देण्याची किमया साध्य करणाऱया माजी कर्णधार कपील देव यांचा आज ५५वा वाढदिवस. १९८३ सालच्या विश्वचषकामुळे भारतीय क्रिकेटला नवीन वळण मिळाले या मतावर खुद्द कपील देव यांनीही सहमती दर्शविली होती. त्यादृष्टीने आज भारतीय संघाने क्रिकेट विश्वात आपला दबदबा कायम राखला आहे. त्या विश्वचषकामुळे त्यापुढील खेळाडूंच्या आत्मविश्वासात नक्कीच भर पडली यात काही शंका नाही.
२०११ साली भारतीय संघाने पुन्हा एकदा विश्वचषक जिंकल्यानंतर कपील देव यांनी सध्याच्या भारतीय संघाचे तोंडभरून कौतुकही केले. तसेच सध्याच्या भारतीय संघाप्रमाणे आमचाही संघ युवा खेळाडूंचा होता असे म्हणत संघात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळाली पाहिजे यावर कपील देव यांचा भर राहीला आहे. दडपणाखाली न खेळता आत्मविश्वासाने खेळणे हीच वृत्ती खेळाडूला पुढे घेऊन जाते हीच विचारसरणी कपील देव आजही युवा खेळाडूंना देतात. अशा या महान खेळाडूला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
या बातमीखालील प्रतिक्रिया बॉक्समध्ये माजी क्रिकेटपटू कपील देव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या
कपील देव @55
भारतीय क्रिकेट संघाला १९८३ साली पहिला विश्वचषक जिंकून देण्याची किमया साध्य करणाऱया माजी कर्णधार कपील देव यांचा आज ५५वा वाढदिवस.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-01-2014 at 12:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil dev 55th birthday