Kapil Dev Kidnap: भारतीय संघाचा माजी सलामीवीर खेळाडू गौतम गंभीरने ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांचे हात पाठीमागे दोरीने बांधलेले आहेत, तर काही लोक त्यांना धक्काबुक्की करत जबरदस्ती घेऊन जात आहेत. चेहऱ्यावर कापडाची पट्टी बांधलेली आहे. व्हिडीओमध्ये १९८३चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल पूर्णपणे असहाय दिसत आहे. पण खरंच त्याचे अपहरण झाले आहे का? जाणून घेऊ या.

माजी भारतीय खेळाडू असहाय नजरेने पाहत असताना दोन पुरुष कपिल देव यांना धरून एका खोलीकडे घेऊन जात असल्याचे क्लिपमध्ये दिसते. गौतम गंभीरने व्हिडीओ शेअर करत गंभीर प्रश्न विचारला की, “वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचे अपहरण झाले आहे? झाले असेल तर कोणी केले?” गंभीरने त्याच्या ट्वीटर प्रोफाईलवर पोस्ट केलेल्या क्लिपमध्ये पुढे लिहिले की, “इतर कोणाकडे आहे का हा व्हिडीओ? आशा आहे की ते प्रत्यक्षात कपिल देव नाहीत आणि कपिल पाजी ठीक असावेत!”

लोक म्हणाले की ही जाहिरात आहे…

गौतम गंभीरने ज्या पद्धतीने हा व्हिडीओ शेअर केला आहे, त्यावरून काहींना काळजी वाटू लागली आहे. मात्र, अनेक युजर्सनी या ट्वीटला उत्तर दिले की, “हा जाहिरातीचा भाग आहे.” एका युजरने तर असे लिहिए आहे की, ‘प्रेक्षकसंख्येसाठी काहीही करू नका, किमान मोठ्या खेळाडूंनी तरी यापासून लांब राहायला हवे कारण, चाहते त्यां अजून पुष्टी झालेली नाही.

हेही वाचा: Yuzvendra Chahal: आर. अश्विनची दमदार कामगिरी अन् चहलची पोस्ट आली चर्चेत; म्हणाला, “फक्त हे नावच…”

मात्र, या व्हिडीबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही. कपिल देव यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही गौतम गंभीरच्या ‘गंभीर’ चिंतेच्या पोस्टवर कोणतेही उत्तर आलेले नाही. याबरोबरच कपिल देव यांच्या चाहत्यांकडून अशा प्रकारचा व्हिडीओ शूट केल्याबद्दल सातत्याने टीका होत आहे. काही सोशल मीडिया युजर्सनी “तुमच्या चाह्त्यांकारता तरी असे काहीही करू नका, किमान दिग्गजांचा तरी आदर केला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: Titas Sadhu: कोण आहे तितास साधू? एशियाडच्या शेवटच्या चार चेंडूत दोन विकेट्स घेत फिरवला सामना अन् टीम इंडियाला बनवले चॅम्पियन

१९८३ मध्ये पहिला विश्वचषक जिंकला

कपिल देव एका जाहिरातीचे शूटिंग करत असल्याचे दिसते. मात्र, ते कोणत्या ब्रँडच्या जाहिरातीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे हे कळू शकलेले नाही. उल्लेखनीय बाब अशी आहे की, याआधी माजी कर्णधार सौरव गांगुली, बॉलिवूड अभिनेत्री काजोलसह अनेक सेलिब्रिटींनी जाहिरातींसाठी असे डावपेच अवलंबले आहेत. आधी व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि नंतर ते बनावट असल्याचे उघड होते. कपिल देव यांनी १९८३ मध्ये पहिल्यांदा जेव्हा भारतीय संघाला एकदिवसीय विश्वचषक जिंकवून दिला होता तेव्हा टीम इंडिया नवखी होती. देशातीलच नव्हे तर जगातील महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्यांची गणना होते.