Kapil Dev says Team India Should Adopt Baseball Approach: टीम इंडिया २०२३ मध्ये भारतात होणारा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. मात्र, खेळाडूंच्या दुखापती हा कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआयसाठी चिंतेचा विषय आहे. श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांचा फिटनेस संघाची चिंता वाढवत आहे. दरम्यान, भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी कर्णधार रोहित शर्माला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

कपिल देव यांनी रोहित शर्माला दिला खास सल्ला –

कपिल देव यांनी रोहित शर्माला विश्वचषकात आक्रमक कर्णधार वृत्ती अंगीकारण्याचा सल्ला दिल. कपिल देव यांच्या म्हणण्यानुसार रोहित शर्माला आक्रमक पध्दत अवलंबावी लागेल. त्यासाठी त्यांनी इंग्लंड संघाचे उदाहरण दिले. भारतानेही बेसबॉलचा मार्ग स्वीकारला पाहिजे, असे कपिल देव यांचे मत आहे. रोहित शर्माची स्तुती करताना त्यांनी बरंच काही सांगितलं आहे.

Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
mahayuti government,
लेख : नव्या विधानसभेकडून दहा ठोस अपेक्षा

कपिल देव यांनी रोहित शर्माचे केले कौतुक –

कपिल देव यांनी खुलासा केला आहे की त्यांना बेसबॉलचा दृष्टिकोन आवडतो. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांच्या अॅशेस मालिकेत याची झलक पाहायला मिळाली. कपिल देव टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले, “माझ्या मते, तर क्रिकेट असे खेळले पाहिजे. रोहित चांगला कर्णधार आहे, पण त्याने आक्रमक असायला हवे. सध्या इंग्लिशसारखे संघ कसे खेळतात, हे पाहावे लागेल. याचा विचार फक्त रोहितच नाही तर सगळ्यांनाच करायचा आहे. आपले प्राधान्य सामने जिंकण्यासाठी असले पाहिजे, न की अनिर्णीत करण्यासाठी.”

हेही वाचा – VIDEO: इशानच्या नवीन हेअयरस्टाइल पाहून सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा म्हणाली जंगली उंदीर, चाहत्यांनीही केल्या मजेशीर कमेंट्स

टीम इंडियाने पहिला विश्वचषक १९८३ साली जिंकला –

कपिल देव हे टीम इंडियाचे अनुभवी अष्टपैलू खेळाडू होते. ज्यांनी १९८३ मध्ये भारताला पहिला विश्वचषक जिंकून दिला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंनी सजलेल्या टीम इंडियाने अंतिम सामन्यात त्यावेळचा सर्वात शक्तिशाली संघ असलेल्या वेस्ट इंडिजचा ४३ धावांनी पराभव केला. कपिल देव यांनी भारतासाठी १३१ कसोटी, २२५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटीत ५२४८ धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय सामन्यात ३७८३ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs IRE: टी-२० मालिकेपूर्वी नेट्समध्ये जसप्रीत बुमराहने पाडला यॉर्कर्स आणि बाउन्सरचा पाऊस, पाहा VIDEO

एकदिवसीय विश्वचषकाला ५ ऑक्टोबरपासून होणार सुरुवात –

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही स्पर्धा भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना २१ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला २०११ मध्ये घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी असेल. एकदिवसीय विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा आशिया कप २०२३ नंतर केली जाऊ शकते.

Story img Loader