Kapil Dev has targeted BCCI over Team India’s schedule: भारतीय संघाला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वर्ल्ड कप खेळायचा आहे. अलीकडच्या काळात टीम इंडियाची कामगिरी साधारण राहिली आहे. बहुतांश खेळाडू जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत कपिल देव यांनी बीसीसीआयबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनी बीसीसीआयच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून बोर्ड आपल्या खेळाडूंची योग्य काळजी घेऊ शकत नाही, असे म्हटले आहे. भारतीय संघाच्या वेळापत्रकावरही माजी कर्णधाराने प्रतिक्रिया दिली आहे.
१९८३ मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव यांनी बीसीसीआयवर संताप व्यक्त केला आहे. द वीकला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की बोर्ड आपल्या खेळाडूंची योग्य काळजी घेत नाही. कपिल देव म्हणाले, “मला माहित नाही. पण जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करता तेव्हा ते योग्य बोर्ड असते. यात काहीही चुकीचे नाही. पण योग्य बोर्डात सुधारणा आवश्यक असते.”
भारतीय संघाच्या वेळापत्रकावरही माजी कर्णधार कपिल देव यांनी आपली प्रतिक्रिया दिली. कपिल देव म्हणाले, “जर मी तुम्हाला भारतीय संघाचे वेळापत्रक दाखवले, जे मी आज पाहिले आहे. हा भारत ११ सामने खेळत आहे आणि त्यांना किती प्रवास करावा लागणार आहे, असे वेळापत्रक कोणी बनवले? आता भारतात संघ खेळत असताना त्याची काळजी कशी घेतली जाईल, या गोष्टींचा विचार व्हायला हवा.”
हेही वाचा – LPL 2023: लाइव्ह सामन्यात साप शिरल्याने दिनेश कार्तिकला आठवली बांगलादेशची नागिन, जाणून घ्या कारण?
माजी कर्णधार कपिल देव पुढे म्हणाले, “तुम्ही धर्मशाला, त्यानंतर बंगळुरू, कोलकाता येथे खेळत आहात. तुम्ही ९ वेगवेगळ्या ठिकाणी सामने खेळत आहात. कोणीतरी मला विचारले की तुम्ही बोर्डाचे अध्यक्ष असता तर मी काय केले असते? यावर मी उत्तर दिले, “जर मी बीसीसीआय अध्यक्ष असतो, तर मी आपल्या संघासाठी चार्टर विमानांची व्यवस्था केली असती. मला वाटते, माझ्या संघाने मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करावी. बोर्डाने या गोष्टी केल्या पाहिजेत.”
हेही वाचा – Team India: “खेळाडूंना अहंकार नाही पण माजी खेळाडूंना”, रवींद्र जडेजाचे कपिल देव यांना प्रत्युत्तर
विश्वचषकापूर्वी भारतीय संघ आशिया कप तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्याच वेळी, भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे, जिथे ते ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. आतापर्यंत दोन एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने एक जिंकला तर दुसरा वेस्ट इंडिजने जिंकला आहे. त्याचबरोबर तिसरा सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावावर करेल. या मालिकेतील शेवटचा तिसरा सामना मंगळवारी खेळला जाणार आहे.