रणवीर सिंगचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘83‘ २४ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणवीर भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. भारताने १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली लॉर्ड्सवर वेस्ट इंडिजचा पराभव करून प्रथमच क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे.

सुनील गावसकरांच्या भूमिकेत ताहिर राज भसीन, यशपाल शर्मांच्या भूमिकेत जतीन सरना, मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेत साकिब सलीम, रवी शास्त्रींच्या भूमिकेत धैर्य करवा, के. श्रीकांत यांच्या भूमिकेत जिवा, मदन लाल यांच्या भूमिकेत हार्डी संधू, बलविंदर सिंग यांच्या भूमिकेत एमी. विर्क, सय्यद किरमानी यांच्या भूमिकेत साहिल खट्टर, संदीप पाटील यांच्या भूमिकेत चिराग पाटील, दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे, कीर्ती आझाद यांच्या भूमिकेत दिनकर शर्मा, रॉजर बिन्नींच्या भूमिकेत निशांत दहिया हे कलाकार आहेत. याशिवाय अभिनेता पंकज त्रिपाठी टीम मॅनेजर पीआर मान सिंग यांची भूमिका साकारत आहे.

हेही वाचा – 83 Movie Review : पाणावलेले डोळे अन् समाधानाने भरलेला ऊर, अंगावर काटे आणणाऱ्या विश्वचषक विजयाची कहाणी

’83’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्या निर्मात्यांनी भारतीय खेळाडूंना १५ कोटी रुपये दिल्याचे कळते. बॉलीवूड हंगामा डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, कपिल देव यांना त्यांची गोष्ट सांगण्यासाठी ५ कोटी रुपये मिळाले. एका स्रोताने बॉलीवूड हंगामाला सांगितले, “चित्रपट बनवण्यापूर्वी खेळाडूंच्या विषयाचे अधिकार आणि वैयक्तिक कथा मिळवणे महत्त्वाचे आहे, विशेषत: जेव्हा तो वास्तविक जीवनातील घटनांमधून लोकांभोवती फिरतो. हे लक्षात घेऊन निर्मात्यांनी १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाला सुमारे १५ कोटी रुपये दिले. यामध्ये कपिल देव यांना सर्वाधिक रक्कम मिळाली.”

हेही वाचा – PHOTOS : ‘‘लाज तर सरकारला वाटली पाहिजे”, चॅम्पियन खेळाडूचं दुर्देव तर बघा; पदकांचा केलाय ‘असा’ वापर!

हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच खूप चर्चेत आहे. आठवडाभरापूर्वी दुबईतील बुर्ज खलिफा येथे ’83’चा ट्रेलर दाखवण्यात आला होता. यावेळी रणवीर, दीपिका पदुकोण आणि कबीर खान देखील उपस्थित होते. रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला. प्रीमियरला रणवीरशिवाय दीपिका पदुकोण, दिग्दर्शक कबीर खान आणि त्याची पत्नी मिनी माथूर, कपिल देव आणि त्याची पत्नी रोमी देखील उपस्थित होते.

Story img Loader