भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची निवड करण्याची जबाबदारी बीसीसीआयने ३ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव, माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड आणि महिला क्रिकेटपटू शांता रंगस्वामी यांची समिती प्रशिक्षकांची निवड करणार आहे. २० डिसेंबर रोजी बीसीसीआयच्या मुंबई येथील मुख्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. आतापर्यंत प्रशिक्षकपदासाठी हर्षेल गिब्ज, मनोज प्रभाकर, वेंकटेश प्रसाद, टॉम मूडी, डेव्ह व्हॉटमोअर, दिमीत्री मॅस्केरिनस आणि रे जेनिंग्ज यांनी अर्ज केल्याचं कळतंय. त्यामुळे यांच्यापैकी कोणाच्या खांद्यावर प्रशिक्षकपदाची जबाबदारी पडतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. २४ जानेवारी २०१९ रोजी भारतीय महिला संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे, या दौऱ्यात ३ वन-डे व टी-२० सामने भारतीय संघ खेळणार आहे. या दौऱ्याआधी बीसीसीआय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाचं नाव जाहीर करेल असं समजतंय.

Story img Loader