Kapil Dev Reaction on Yograj Singh Statement Video: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंह हे आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. नुकतच त्यांनी कपिल देव यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं, जे चर्चेचा विषय ठरलंय, पण यादरम्यान आता कपिल देव यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. योगराज सिंह यांनी नुकतेच भारताला १९८३ चा विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योगराज सिंह यांनी असा दावा केला होता की, ते एकदा कपिल देव यांच्या घरी रागाच्या भरात त्यांना मारण्यासाठी बंदूक घेऊन गेले होते. योगराज सिंह यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. योगराज सिंह यांच्या या वक्तव्यावर आता कपिल देव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – BCCI ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियाला लावणार शिस्त, खेळाडूंच्या कुटुंबासाठी नवीन नियम; पत्नी आणि गर्लफ्रेंड…

पत्रकारांनी योगराज सिंह यांच्या या वक्तव्याबद्दल कपिल देव यांना विचारले असता त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कपिल देव यांनी योगराज सिंह यांना ओळखण्यासही नकार दिला. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना बंदुकीच्या वक्तव्याचा संदर्भ देत पत्रकाराने विचारताच ते म्हणाले, ‘कोण आहे?’ तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? यानंतर तिथे उपस्थित असलेल्यांनी सांगितले की योगराज सिंह हे टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगचे वडील आहेत. यावर कपिल देव म्हणाले, ‘ठीक आहे, अजून काही?’ असं म्हणत ते पुढे निघून गेले.

हेही वाचा – युवराज सिंहचे वडील कपिल देव यांना मारण्यासाठी बंदूक घेऊन पोहोचले होते घरी, स्वत: केला खुलासा; काय आहे नेमकं प्रकरण?

अनफिल्टर्ड बाय समीदश या पोडकास्टमध्ये बोलताना योगराज सिंह म्हणाले, ‘जेव्हा कपिल देवला भारत, नॉर्थ झोन आणि हरियाणाचे कर्णधारपद मिळाले, तेव्हा त्यांनी मला कोणतेही कारण नसताना संघातून वगळले. मी कपिलला प्रश्न विचारावेत अशी माझ्या पत्नीची इच्छा होती. मी तिला म्हणालो, ‘मी या माणसाला धडा शिकवीन.’ मी माझं पिस्तूल काढलं आणि सेक्टर ९ मधील कपिलच्या घरी गेलो. तो आईबरोबर घराबाहेर आला. मी त्याला खूप घालून पाडून बोललो, शिवीगाळ केली. मी त्याला म्हणालो, ‘तुझ्यामुळे मी एक मित्र गमावला आहे, आणि तू जे केले आहेस त्याची किंमत तुला चुकवावी लागेल’.

हेही वाचा – India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद

योगराज सिंह यांनी पुढे सांगितले की, ‘मी त्याला (कपिल देव) सांगितले होते की, ‘मला तुझ्या डोक्यात गोळी झाडायची आहे, पण मी तसं करणार नाही कारण तुझी आई पवित्र आहे, जी इथे उभी आहे’. मग मी पत्नीला म्हटलं इथून निघूया आणि तेव्हाच ठरवलं की मी क्रिकेट खेळणार नाही, युवी क्रिकेट खेळेल.

हेही वाचा – Nitish Reddy: नितीश रेड्डी गुडघ्यावर चढला तिरूपतीच्या पायऱ्या, ऑस्ट्रेलियातील शतकानंतर देवाचे असे मानले आभार; VIDEO व्हायरल

युवराज सिंहप्रमाणे योगराज सिंगही टीम इंडियाकडून खेळले आहेत. डिसेंबर १९८० मध्ये ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण ते त्यांच्या कारकिर्दीत फक्त १ कसोटी आणि ६ एकदिवसीय सामने खेळू शकले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil dev reaction on yograj singh claim that he went to his house with pistol to kill watch video bdg