Kapil Dev said that Team India will win the World Cup 2023: भारतीय क्रिकेट संघाला प्रथमच विश्वविजेता बनवणारा माजी कर्णधार कपिल देव यांनी टीम इंडियाबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. कपिल देव यांना विश्वास आहे की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ आपल्या भूमीवर एकदिवसीय विश्वचषक जिंकू शकतो, परंतु ते म्हणाले की त्यांना प्रबळ दावेदार म्हणून लेबल लावणे योग्य नाही. कारण नशिबावर बरेच काही अवलंबून असते. ते म्हणाले की, हृदय काहीतरी सांगतं आणि मन म्हणतं की अजून खूप मेहनत करायची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियन संघाचे कर्णधार कपिल देव जम्मू तवी गोल्फ कोर्स येथील एका कार्यक्रमात बोलत होते. कपिल देव ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान आयोजित जे अँड के ओपनच्या तिसऱ्या हंगामाच्या शुभारंभाच्या वेळी बोलत होते. त्यांनी मोहम्मद सिराजच्या आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या चमकदार कामगिरीचे कौतुक केले. कपिल देव यांनी यादरम्यान शुबमन गिलला भविष्यातील स्टार म्हणून संबोधले.

आमची टीम चांगली आहे –

कपिल देव म्हणाले, “आम्ही अव्वल चारमध्ये आलो, तर ते महत्त्वाचे ठरेल. तेव्हापासून ही भाग्याची गोष्ट आहे. आम्ही प्रबळ दावेदार आहोत, असे आत्ताच म्हणता येणार नाही. आमची टीम चांगली आहे. हृदय काहीतरी सांगतं आणि मन म्हणतं की अजून खूप मेहनत करायची आहे. मी माझ्या संघाला ओळखतो, पण इतर संघांना मी ओळखत नाही. अशा स्थितीत उत्तर देणे चुकीचे ठरेल. भारताचा विचार केला, तर हा संघ जिंकू शकतो. त्यांनी उत्कटतेने खेळले पाहिजे.”

हेही वाचा – VIDEO: “जर धोनी कर्णधार नसता, तर तो भारताकडून…”; माहीबाबत गौतम गंभीरचं पुन्हा एकदा मोठं वक्तव्य

वेगवान गोलंदाजांचे कौतुक –

भारताने रविवारी श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करत आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. मोहम्मद सिराजने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने ६ विकेट्स घेतल्या आणि श्रीलंकेचा संघ 50 धावांवर आटोपला झाला. मोहम्मद सिराज आणि वेगवान गोलंदाजांचे कौतुक करताना कपिल देव म्हणाले, “सिराजने शानदार गोलंदाजी केली. मला आनंद आहे की आता आमचे वेगवान गोलंदाज प्रत्येक देशात दहा विकेट्स घेत आहेत. हे सोन्याहून पिवळे आहे. एकेकाळी आम्ही फिरकीपटूंवर अवलंबून होतो, पण आता तशी परिस्थिती नाही. ही या संघाची ताकद आहे.”

अटीतटीचे सामने बघायचे आहेत –

कपिल यांनी असेही सांगितले की, एक चाहता म्हणून त्याना आशिया कपसारखा एकतर्फी सामना नव्हे, तर अटीतटीचे सामने पाहायचे आहेत. ते म्हणाले, “एक क्रिकेटर म्हणून मला अटीतटीचे सामने बघायला आवडतात, पण एक खेळाडू म्हणून मी त्यांना ३० धावांवर बाद करून सामना जिंकू इच्छितो. एक प्रेक्षक म्हणून मला रोमांचक सामने बघायचे आहेत.”

हेही वाचा – श्रेयस अय्यरच्या फिटनेसबद्दल बोलताना गौतम गंभीरने ‘NCAवर उपस्थित केला प्रश्न; म्हणाला, ‘प्रश्न विचारायचेच असतील, तर…’

बोटे दाखवणे सोपे आहे –

सलामीवीर शुबमन गिलचे कौतुक करताना कपिल देल म्हणाले, “हा एक युवा खेळाडू आहे जो भारतीय क्रिकेटचे भविष्य आहे. असा खेळाडू भारतात असणे ही अभिमानाची बाब आहे.” शिखर धवन, रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल सारखे वरिष्ठ खेळाडू विश्वचषक संघात स्थान मिळवू शकले नाहीत. कपिल यांनी निवडकर्त्यांचा बचाव केला आणि म्हणाले, “ज्यांना संघात स्थान मिळू शकले नाही त्यांची चर्चा केली जात आहे. प्रत्येकाचे स्वतःचे मत आहे. निवडकर्त्यांना आमच्यापेक्षा चांगले माहित आहे. कारण ते आपापसात सल्लामसलत करतात आणि सर्वोत्तम संघ निवडतात. त्यांना त्यांचे काम करू द्या. बोटे दाखवणे सोपे आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil dev said that team india will win the world cup 2023 but it is not right to call them a strong contender right now vbm
Show comments