कुमार संगकारा हा सर्वोत्तम यष्टिरक्षक-फलंदाज असल्याचे मत भारताला १९८३साली विश्वचषक जिंकवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले आह़े संगकाराने रविवारी खेळलेल्या लढतीत जलद शतक झळकावून श्रीलंकेला इंग्लंडविरुद्ध सहज विजय मिळवून दिला़ त्या विजयानंतर संगकारावर कौतुकांचा वर्षांव झाला़  
संगकाराचे कौतुक करताना कपिल म्हणाले, ‘‘५० षटके यष्टीमागे उभे राहिल्यानंतर फलंदाजी करणे सोपी गोष्ट नाही़ संगकारा आज अप्रतिम खेळला़  श्रीलंकेसाठी सामना जिंकून देणारा खेळाडू असल्याचे संगकारा वारंवार सिद्ध करत आह़े माझ्या मते तो सर्वोत्तम यष्टिरक्षक-फलंदाज आहे आणि श्रीलंकन संघात त्याचे योगदान मोलाचे आह़े  सकारात्मक दृष्टीकोनातूनच तो मैदानात उतरतो़ ’’

Story img Loader