महेंद्रसिंग धोनीच्या ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील भविष्याबाबतचा निर्णय निवड समितीवर सोपवा, असा सल्ला भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी दिला आहे. भारताला १९८३चा विश्वचषक जिंकून देणाऱ्या कपिलदेव यांनी ३६ वर्षीय धोनीच्या सध्याच्या फॉर्मची प्रशंसा केली, परंतु ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये त्याला आणखी संधी द्यायची की नाही, हा निर्णय निवड समितीला घ्यावा लागेल, असेही ते म्हणाले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
‘कोणताही खेळाडू आयुष्यभर खेळत नाही. धोनी सध्या चांगल्या फॉर्मात आहे, परंतु त्याच्या ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील निर्णय निवड समितीवर सोपवायला हवा. ते त्यांची कामगिरी उत्तमरीत्या पार पाडत आहेत. मी मत व्यक्त करू शकतो आणि त्यावरून पुन्हा गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ शकते. तसे मला करायचे नाही. त्यामुळे निवड समितीला त्यांचा निर्णय घेऊ द्या,’ असे कपिलदेव म्हणाले.
First published on: 19-11-2017 at 01:51 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil dev says only selectors should decide about mahendra singh dhonis future