आज भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. जवळपास १० महिन्यांनंतर दोन्ही संघ आमनेसामने येतील. दरम्यान, या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी हा सामना कोण जिंकणार यासंदर्भात एक भाकीत केलं आहे. आकडेवारी बघिततली तर भारतीय संघाचे पारडे जड आहे. मात्र, टी-२० सामन्यामध्ये जो संघ चांगली कामगिरी करतो, तो जिंकतो, असे ते म्हणाले.
काय म्हणाले कपिल देव?
“तुम्ही क्रिकेटमध्ये निश्चितपणे काहीही सांगू शकत नाही. एकदा तुम्ही वनडे आणि कसोटी क्रिकटमध्ये भाकीत करू शकता, मात्र, टी-२० मध्ये हे सांगणं कठीण आहे. गेल्या वर्षी विश्वचषकात झालेल्या पराभवानंतर आता बरचं काही बदललं आहे. भारतीय संघ आधीपेक्षा मजबूत दिसतो आहे. आकडेवारी बघितली तर भारतीय संघाचे पारडे जड आहे. मात्र, टी-२० सामन्यामध्ये जो संघ मैदानात चांगली कामगिरी करेल तो जिंकेल”, असे ते म्हणाले.
आज भारत-पाकिस्तान आमने-सामने
आशिया चषकात भारताचा आच पहिल्या सामना पाकिस्तानशी आहे. जवळपास १० महिन्यांनंतर दोन्ही संघ आमनेसामने येतील. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. मात्र, टी-२० फॉरमॅटमध्ये दोन्ही संघ मजबूत स्थितीत आहे.