Kapil Dev’s Statement on Injured Players: आशिया कप २०२३ स्पर्धेसाठी श्रेयस अय्यर आणि केएल राहुल भारतीय संघात परतले आहेत. त्यामुळे माजी कर्णधार कपिल देव यांनी जखमी खेळाडूंबद्दल महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. राहुल आणि अय्यर आपापल्या दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर होते. श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त होऊन संघात परतला असला, तरी केएल राहुलला अजूनही किरकोळ दुखापत आहे, ती आशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी ठीक होण्याची शक्यता आहे.

आता कपिल देव यांनी जखमी खेळाडूंबाबत टीम इंडियाला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, खेळाडूंची अगोदरच चाचणी घ्यावी, अन्यथा संपूर्ण संघाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, कपिल देव म्हणाले, “प्रत्येक खेळाडूची चाचणी झाली पाहिजे. विश्वचषक अगदी जवळ आला आहे, पण तरीही तुम्ही खेळाडूंना संधी दिली नाही. ते वर्ल्डकपसाठी गेला आणि जखमी झाला तर? संपूर्ण संघाला याचा त्रास सहन करावा लागेल.”

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?
Rohit Sharma Statement on India Defeat in Pink Ball Test Said we didnt play well enough to win the game
IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?

…तर संघाबाहेर राहिलेल्या खेळाडूंसोबत योग्य होणार नाही –

माजी कर्णधार पुढे म्हणाले, “किमान इथे त्यांना फलंदाजी किंवा गोलंदाजीची संधी मिळेल आणि त्याला थोडी लय प्राप्त करता येईल. सगळ्यात वाईट म्हणजे वर्ल्डकपदरम्यान त्यांना पुन्हा दुखापत झाली, तर संघाबाहेर राहिलेल्या खेळाडूंसोबत योग्य होणार नाही. पुनरागमन केलेल्या सर्व जखमी खेळाडूंना संधी द्यायला हवी. जर ते तंदुरुस्त असतील, तर ते विश्वचषक खेळू शकतात.”

हेही वाचा – झलक.. बुद्धिबळातील भारतीय झपाटय़ाची!

माजी कर्णधार म्हणाला की, आशिया कप ही संघाला विश्वचषकासाठी तयार करण्याची चांगली संधी आहे. कपिल देव म्हणाले, “प्रतिभेची कमतरता नाही, पण तो तंदुरुस्त नसेल तर भारताला आता विश्वचषकात बदल करण्याची संधी मिळेल. तुम्हाला विश्वचषक स्पर्धेसाठी संघ तयार करण्याची चांगली संधी आहे आणि आशिया कप हे एक चांगले व्यासपीठ आहे.

आशिया कप ही संघाला विश्वचषकासाठी तयारी करण्याची चांगली संधी –

भारताचा माजी कर्णधार म्हणाले की, आशिया कप ही संघाला विश्वचषकासाठी तयारी करण्याची चांगली संधी आहे. कपिल देव म्हणाले, “प्रतिभेची कमतरता नाही, पण ते तंदुरुस्त नसतील, तर भारताला आता विश्वचषकासाठी संघात बदल करण्याची संधी असेल. तुमच्याकडे विश्वचषक स्पर्धेसाठी संघ तयार करण्याची चांगली संधी आहे आणि त्यासाठी आशिया कप हे एक चांगले व्यासपीठ आहे.”

हेही वाचा – IBSA World Games: भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाला हरवून सुवर्णपदकावर कोरले नाव

कपिल देव पुढे म्हणाले, “या खेळाडूंनी जावे आणि स्वत:ला व्यक्त करावे, अशी माझी इच्छा आहे. पण जर कोणत्याही प्रकारची शंका असेल, तर त्यांना आजूबाजूला राहण्याची गरज नाही. जर तुम्ही त्यांना संधी दिली नाही, तर ते खेळाडूंसोबतच निवडकर्त्यांसाठीही योग्य होणार नाही. मला माहित आहे की, विश्वचषक भारतात खेळवला जाईल, परंतु तुम्ही सर्वोत्तम आणि तंदुरुस्त संघ निवडला पाहिजे.”

Story img Loader