भारतीय क्रिकेटसंघाचे माजी कर्णधार कपील देव यांना इंडो-युरोपीयन बिझनेस फोरमने(आयबीइएफ) जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. क्रिडा क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करणाऱया काही निवडक खेळाडूंना या फोरमतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. भारताला पहिलावहिला विश्वचषक उंचावण्याचा मान मिळवून देणारा कर्णधार आणि अष्टपैलू शैलीच्या जोरावर भारतीय क्रिकेटला उंची गाठून देण्यामध्ये कपील देव यांच्या मोठा वाटा राहिला आहे.
पुरस्कार स्वीकारताना कपील देव म्हणाले की, मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. आज भारत जगातील कोणत्याही देशाशी व्यापार करण्यासाठी सज्ज आहे. एकेकाळी इंग्लंडने भारतावर अधिराज्य गाजवले असल्यामुळे मला नेहमी इंग्लंडचा तिरस्कार वाटत आला आहे पण, त्यांना आम्हाला क्रिकेट हा अद्भुत खेळ दिला याचा मला आनंद आहे, असेही ते पुढे म्हणाले.
कपील देव यांचा ब्रिटनमध्ये जीवनगौरव पुरस्कारने सन्मान
भारतीय क्रिकेटसंघाचे माजी कर्णधार कपील देव यांना इंडो-युरोपीयन बिझनेस फोरमने(आयबीइएफ) जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.
First published on: 25-09-2014 at 01:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil dev wins lifetime achievement award in uk