आजपासून सुरू होत असलेल्या १९ वर्षांखालील वयोगटाच्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी होत असलेल्या क्रिकेटपटूंना माजी क्रिकेटपटू कपिल देव याने शुभेच्छा दिल्या आहेत. सहभागी होत असलेल्या सर्वांना शुभेच्छा! तुम्हीच आता तुमचे भविष्य निश्चित करणार आहात, असे कपिल देव याने आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या नऊ देशांसोबतच एकूण १६ देशांचे संघ या विश्वकरंडकामध्ये सहभागी होत आहेत. बांगलादेशातील चितगाँगमध्ये आजपासूनच या स्पर्धेला सुरुवात होते आहे. सलामीचा सामना आयोजक बांगलादेश विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे. चितगाँगमधील झहूर अहमद मैदानावर हा सामना होणार आहे. यापूर्वी तीनवेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणारा भारतीय संघ उद्या गुरुवारी आर्यलंडविरोधात सलामीचा सामना खेळणार आहे.
U19 विश्वकरंडक स्पर्धेतील खेळाडूंना कपिल देवकडून शुभेच्छा
कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या नऊ देशांसोबतच एकूण १६ देशांचे संघ या विश्वकरंडकामध्ये सहभागी होत आहेत
Written by विश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 27-01-2016 at 11:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil dev wishes good luck to u 19 world cup players