Kapil Dev on Babar Azam: पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर क्रिकेट जगतात दोन मते तयार झाली आहेत. खरेतर, पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर बाबर आझमकडे बोटे दाखवली जात आहेत. माजी क्रिकेटपटूंच्या आणि त्याच्या चाहत्यांच्या मते, बाबरने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही. काही क्रिकेट समीक्षकांच्या मते, कॅप्टन्सीचा दबाव बाबरला झेपत नसल्याने त्याच्या फलंदाजीवर मोठा परिणाम होत आहे. यावर आता माजी विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, “पाकिस्तानी कर्णधाराची खराब कामगिरी झालेली असूनही त्याला कर्णधारपदी काही काळ असू द्यावे,” असे म्हणत त्याचे समर्थन केले आहे.

रणवीर अलाहाबादियाच्या एका कार्यक्रमात कपिल देव यांनी लोकांना बाबरच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आज तुम्ही म्हणाल की बाबर चांगली कामगिरी करत नाही कारण तुम्ही सध्याची परिस्थिती पाहून असे विधान करत आहात. पण याच कर्णधाराने सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानला नंबर वन संघ बनवले होते. जेव्हा कोणी शून्यावर बाद होतो मारतो तेव्हा ९९टक्के लोकं म्हणतील त्याला काढून टाका आणि शतक झळकावणाऱ्या सामान्य खेळाडूला पाठिंबा द्या आणि म्हणतील तो पुढचा सुपरस्टार आहे. मात्र, असे नसते म्हणून, सध्याच्या कामगिरीबरोबर जाऊ नका.” ते पुढे म्हणाले की, “एक किंवा दोन कमी धावसंख्येकडे पाहण्याऐवजी, तो संघाला अवघड परिस्थितीतून कसा बाहेर काढतो हे जास्त महत्वाचे आहे. कठीण परिस्थितीत तो कसा खेळतो यावरून खेळाडूचे मूल्यमापन केले पाहिजे.”

Indian Cricket Team To Get New Batting Coach In Gautam Gambhir Support Staff BCCI To Take New Decision
टीम इंडियाला मिळणार नवा फलंदाजी प्रशिक्षक? गौतम गंभीरच्या कोचिंगवर प्रश्नचिन्ह, BCCI मोठा निर्णय घेणार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
Yuvraj Singh Father Yograj Singh Big Revelation He Wanted to Shoot Kapil dev and went House with pistol
युवराज सिंहचे वडील कपिल देव यांना मारण्यासाठी बंदूक घेऊन पोहोचले होते घरी, स्वत: केला खुलासा; काय आहे नेमकं प्रकरण?
fti former president gajendra chauhan s
“नागपूरने महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला, आता पंतप्रधान देणार”, ‘या’ अभिनेत्याच्या वक्तव्याने…

बाबरसाठी कपिल देव यांचे कठोर शब्द हे सिद्ध करतात की तो किती चांगला खेळाडू आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्याला आणखी काही सिद्ध करण्याची गरज नाही. पाकिस्तानकडून सर्वाधिक २५० धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पाकिस्तानी कर्णधार तिसऱ्या स्थानावर होता. त्याने केवळ तीन अर्धशतके झळकावली आणि विश्वचषकात तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही.

विश्वचषकातील पराभवानंतर बाबर आझम कर्णधार राहणार का?

आझमने पाकिस्तानला आतापर्यंत तीन आयसीसी स्पर्धांमध्ये विजय मिळवून दिला आहे आणि अंतिम अडथळा पार करण्यात अपयशी ठरला आहे. त्याने दोन टी-२० विश्वचषक गमावले आहेत. २८ वर्षीय खेळाडूने दोन आशिया चषकही गमावले आहेत आणि आता ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत तो गट टप्प्यातून बाहेर पडला आहे. आझमला एकदिवसीय किंवा टी२० कर्णधारपदावरून हटवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: IND vs NZ, Semi-final: भारत-न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या सामन्यात पंच विक्रम करणार, ICCने सामना अधिकाऱ्यांची यादी केली जाहीर

शनिवारी झालेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, इंग्लंडने विश्वचषकातील त्यांच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा ९३ धावांनी पराभव केला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही आपले स्थान निश्चित केले. इंग्लंडने ही विश्वचषक मोठी सातव्या स्थानावर संपवली. त्यांनी शेवटचे दोन सामने जिंकून सहा गुण मिळवले आणि २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ते पात्र ठरले आहेत.

Story img Loader