आयपीएलने स्थानिक खेळाडूंचे भले केले, त्यांना पैसा आणि ग्लॅमर मिळवून दिले याचा पुन्हा एकदा प्रत्यय लिलावाच्या दुसऱ्या दिवशी आला. पहिल्या दिवशी नावाजलेल्या खेळाडूंच्या लिलावात कोटी कोटी उड्डाणे पाहायला मिळाली, पण दुसऱ्या दिवशीही स्थानिक खेळाडूंना संघात घेताना मालकांनी हात आखडता घेतला नाही. दुसऱ्या दिवशीच्या लिलावात सरस ठरला तो रेल्वेच्या संघातील अष्टपैलू खेळाडू करण शर्मा. सनरायजर्स हैदराबाद संघाने करणला तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपये मोजून आपल्या संघात घेतले, तर ऋषी धवनलाही यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने ३ कोटी रुपये देत संघात स्थान दिले. यंदाच्या रणजी मोसमात महाराष्ट्राकडून सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करणाऱ्या केदार जाधवला दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाने दोन कोटी रुपये मोजत आपल्या संघात घेतले.
गेल्या आयपीएलमध्ये ‘लेग स्पिनर’ करण हैदराबादच्याच संघात होता आणि त्याने चमकदार कामगिरीही केली होती. गेल्या मोसमात त्याने १३ सामन्यांमध्ये ११ बळी मिळवले होते आणि त्यावेळी त्याची सरासरी
यंदाच्या रणजी हंगामात सर्वाधिक बळी रिषीच्या नावावर होत्या. त्यामुळे त्याचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला जोरदार मागणी होती. त्याची मूळ किंमत २० लाख रुपये असली तरी त्याला संघात घेण्यासाठी पंजाबच्या संघाला ३ कोटी रुपये मोजावे लागले.
रणजीचे उपविजेत्या ठरलेल्या महाराष्ट्राच्या संघाचा फलंदाजीतील आधारस्तंभ आणि यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावा करणाऱ्या केदार जाधवला यावेळी लिलावात चांगलाच भाव मिळाला. केदारची लिलावातील मूळ किंमत ३० लाख रुपये होती, पण त्याच्यावर जबरदस्त बोलींचा वर्षांव होत होता. हैदराबादने त्याच्यावर
आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या रजत भाटियाला (१.७ कोटी) राजस्थान रॉयल्सने घेतले, तर मनीष पांडेला (१.७ कोटी) कोलकाता नाइट रायडर्स संघाने घेतले. मुंबई इंडियन्सला यष्टीरक्षक आणि तडफदार फलंदाज आदित्य तरेला (१.६ कोटी) आपल्या संघात कायम ठेवण्यात यश आले. पण वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीला (१.१० कोटी) संघात कायम ठेवणे मुंबईला जमले नाही, त्याला राजस्थान रॉयल्सने संघात घेतले.
मानधनाबाबत मी समाधानी आहे. या पेक्षाही जास्त मानधन मिळाले असते. तथापि, दिल्लीकडून पुन्हा
– केदार जाधव, दिल्ली डेअरडेव्हिल्स
पहिल्या बोलीनंतर चिंता नव्हती
माझ्यावर कोणीतरी बोली लावावी असे वाटत होते. माझ्यासाठी पहिली बोली लागली, त्यानंतर मला चिंता नव्हती. मला लिलावात किती रक्कम मिळेल याबद्दल मला काळजी नव्हती. सनरायझर्स हैदराबाद संघ माझ्यासाठीच्या बोलीत स्वारस्य दाखवील याची कल्पना होती, मात्र ३.७५ कोटी एवढय़ा रकमेला खरेदी करतील असे वाटले नव्हते. सर्वाधिक बोली माझ्यासाठी लागेल असे अजिबातच वाटले नव्हते.
करण शर्मा, सनरायझर्स हैदराबाद
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा