बीसीसीआयने शुक्रवारी मोठा निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. बोर्डाने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय वरिष्ठ निवड समितीची हकालपट्टी केली. चेतन शर्मा (उत्तर विभाग), हरविंदर सिंग (मध्य विभाग), सुनील जोशी (दक्षिण विभाग) आणि देबाशिष मोहंती (पूर्व विभाग) यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. चेतन शर्मा निवड समितीचे प्रमुख असल्याने त्यांच्या कार्यकाळात भारत दोन आयसीसी स्पर्धांमध्ये विजेतेपदाविना परतला. टीम इंडिया टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झाला त्याआधी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध अंतिम फेरीत पराभूत झाला. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.

यासर्व घटनेनंतर विराट कोहलीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ‘कर्मा रिटर्न्स बॅक’ असा ट्रेंड चालवला आहे. बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केल्यानंतर चेतन शर्मा आणि सौरव गांगुली यांना कर्माची फळे इथेच भोगावी लागतात असे म्हणत विराटच्या चाहत्यांनी ट्रोल केले. सोशल मीडियावर निवड समिती बरखास्त केल्यानंतर चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते, कारण गेल्या वर्षभरात घडलेल्या प्रकारामुळे प्रत्येकजण नक्कीच निराश झाला होता. मागच्या वर्षी याच दिवशी (१८ नोव्हें.२०२१) विराट कोहलीची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. तब्बल पूर्ण एक वर्षानंतर याच दिवशी निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

बीसीसीआयने टी२० विश्वचषक २०२२ नंतर चेतन शर्मांच्या नेतृत्वाखालील निवड समिती बरखास्त करण्यात आली. मागील वर्षी कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर विराट कोहली आणि निवड समितीमध्ये बराच वाद झाला होता, याशिवाय कोहलीचे माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीसोबतही मतभेद झाल्याचे समोर देखील आले होते. चाहत्यांनी मीम्सद्वारे आठवण करून दिली की सौरव गांगुली आता बीसीसीआय अध्यक्ष नाही, चेतन शर्मा आता निवड समितीचे अध्यक्ष नाहीत. पण किंग कोहली अजूनही किंग आहे.

Story img Loader