रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कर्नाटक व विदर्भ यांच्यातील रणजी क्रिकेट सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णीत राहिला. मात्र पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर कर्नाटकने तीन गुणांची कमाई केली. शेवटच्या दिवशी कर्नाटकच्या रवीकुमार समर्थ व करुण नायर यांनी शानदार शतके झळकावत कौतुकास्पद कामगिरी केली.
कर्नाटकने पहिल्या डावातील ४० धावांच्या आघाडीमुळे शनिवारीच तीन गुण निश्चित केले होते. शेवटच्या दिवशी त्यांना निर्णायक विजय मिळवणे अशक्य होते. त्यामुळेच त्यांचे फलंदाज दुसऱ्या डावात कशी कामगिरी करतात याचीच उत्सुकता होती. कर्नाटकने १ बाद ९३ धावांवर दुसरा डाव पुढे सुरू केला. समर्थ व नायर यांनी शतके साकारतानाच चौथ्या विकेटसाठी १७६ धावांची अखंडित भागीदारी केली. त्यामुळे कर्नाटकला ३ बाद ३३१ धावांवर दुसरा डाव घोषित करता आला. विजयासाठी ३७२ धावांचे आव्हान मिळालेल्या विदर्भने दुसऱ्या डावात बिनबाद १७ धावा केल्या.
समर्थने शैलीदार खेळ करीत १२१ धावा केल्या. त्याने कव्हर ड्राइव्ह, ऑन ड्राइव्ह अशी सुरेख फटकेबाजी केली. नायर याने नाबाद १०१ धावा करताना चौफेर फटकेबाजी केली. त्याचे शतक पूर्ण झाल्यानंतर कर्नाटकचा डाव घोषित करण्यात आला. विदर्भ संघाकडून स्वप्निल बंडीवारने ५० धावांमध्ये दोन बळी घेतले.
विदर्भ संघाने ११ षटकांत बिनबाद १७ धावा केल्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एकमेकांशी चर्चा करीत खेळ थांबविला.

संक्षिप्त धावफलक
कर्नाटक : ३५० व ३ बाद ३३१ घोषित (रवीकुमार समर्थ १२१, करुण नायर नाबाद १०१, स्वप्निल बंडीवार २/५०)
विदर्भ : ३१० व बिनबाद १७