अंतिम सामन्यात कर्नाटकच्या संघाने महाराष्ट्रावर ७ गडी राखून मात करत हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर रणजी स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. महाराष्ट्राच्या १५७ धावांचे आव्हान कर्नाटकने केवळ तीन गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह कर्नाटकने सातव्यांदा रणजी करंडकावर आपले नाव कोरले आहे. पहिल्या डावात शतक झळकावणा-या लोकेश राहुलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. विजयानंतर खूप आश्चर्य आणि विलक्षण भावना मनात दाटून आल्या आहेत. आम्ही यासाठी खूप मेहनत घेतली होती. त्यामुळे हा विजय अतिश्य महत्वपूर्ण असल्याचे कर्नाटक संघातील रॉबिन उथ्थपाने सांगितले.
रणजी स्पर्धेत कर्नाटकचा महाराष्ट्रावर विजय
अंतिम सामन्यात कर्नाटकच्या संघाने महाराष्ट्रावर ७ गडी राखून मात करत हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर रणजी स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे.
First published on: 02-02-2014 at 05:20 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka beat maharashtra to win ranji trophy