पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी दर्शविल्याबद्दल आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मुंबई इंडियन्सचा फलंदाज दिनेश कार्तिक याच्या सामन्यातील मानधनातून पाच टक्के रक्कम कापण्यात आली आहे. ११व्या षटकात स्विपचा फटका मारण्याच्या नादात रवींद्र जडेजाचा चेंडू पॅडवर आदळल्यानंतर पंचांनी त्याला पायचीत ठरवले. त्यानंतर कार्तिकने पंचांच्या दिशेने बॅट दाखवून नाराजी व्यक्त केली. सामनाधिकाऱ्यांनी त्याला ही शिक्षा सुनावली.

Story img Loader