मोन्झा येथील पहिल्या शर्यतीत चांगली कामगिरी केल्यानंतर भारताचा आघाडीचा ड्रायव्हर नरेन कार्तिकेयनने झेले रेसिंगशी करार वाढवला आहे. या आठवडय़ाअखेर होणाऱ्या ऑटो ग्रां. प्रि.मधील मोरोक्को येथील दुसऱ्या शर्यतीत कार्तिकेयन सहभागी होणार आहे. गेल्या मोसमात हिस्पानिया रेसिंग संघासोबत फॉम्र्युला-वन शर्यतीत सहभागी झालेल्या कार्तिकेयनने मोन्झा येथील पहिल्या शर्यतीत पाचवे स्थान पटकावले होते. मात्र ब्रेकमध्ये बिघाड झाल्यामुळे त्याला दुसऱ्या शर्यतीतून माघार घ्यावी लागली होती. ड्रायव्हर्स अजिंक्यपद शर्यतीत कार्तिकेयन सातव्या क्रमांकावर आहे. कार्तिकेयन म्हणाला, ‘‘मोरोक्को शर्यतीत मी सहभागी होणार असलो तरी प्रत्येक शर्यतीनुसार मी त्यांच्याशी करार करणार आहे. प्रत्येक शर्यतीसाठी तंदुरुस्त राहण्याचा मी प्रयत्न करणार आहे.’’

Story img Loader