लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या पी. कश्यपने विश्व बॅडमिंटन क्रमवारीत पुरुषांच्या गटात कारकिर्दीतील सर्वोत्तम असे सातवे स्थान पटकावले आहे. हैदराबादच्या या गुणी युवा खेळाडूने या वेळी चीनच्या चेन जीन याला मागे टाकत सातवा क्रमांक पटकावला, तर महिलांच्या गटात ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने दुसरे स्थान कायम राखले आहे. या क्रमवारीत पुरुषांच्या गटात मुंबईच्या अजय जयरामने ३० वे स्थान कायम राखले आहे.
महिलांच्या गटात सायनाने आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च दुसऱ्या क्रमांकावरकोणालाही कब्जा करू दिलेला नाही. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती चीनची ली झेरुई हिने पहिले स्थान कायम राखले आहे. मुंबईची युवा बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने क्रमवारीतील १६ वे स्थान कायम राखले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा