गुडघ्याच्या दुखापतीमुळे भारताचा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा विजेता बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपचा ऑलिम्पिक प्रवेश कठीण झाला आहे. त्याला मलेशियन सुपर सीरिज व सिंगापूर खुल्या स्पर्धामधून माघार घ्यावी लागली आहे.
ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पहिल्या १६ मानांकनात स्थान राखावे लागणार आहे. मात्र दोन स्पर्धामधील माघारीमुळे कश्यपला या मानांकनात स्थान मिळवणे कठीण झाले आहे.
‘‘गुडघ्याची दुखापत खूप मोठी आहे. त्यावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांनी मी दोन आठवडय़ांत तंदुरुस्त होईन असा विश्वास दिला होता. मात्र दुखापतीमधून मी तंदुरुस्त होऊ शकलो नाही. त्यामुळे मी दुसऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेतली आहे. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. घाईघाईने तंदुरुस्त होण्याबाबत माझा आग्रह नाही. मला आणखी तीन आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. मे किंवा जूनमध्ये मी पुन्हा खेळू शकेन,’’ असे कश्यपने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा