गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाचीच चर्चा जोरदार सुरू होती. आता ही चर्चा सत्यात उतरत आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अशी ओळख बनलेली ही जोडी या आठवड्यात विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून विकी आणि कतरिना यांच्या विवाहाची जोरदार तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवघ्या दोन दिवसांनी राजस्थानमधील एका किल्ल्यावर शाहीथाटात ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. विकी-कतरिनाचा विवाह राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये या ठिकाणी होणार आहे. या सोहळ्याला फक्त कुटुंबातील काही निवडक व्यक्ती आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित असणार आहेत. विकी आणि कतरीना यांचा अलिकडेच प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान आणि मिनी माथुरच्या घरी रोका समारंभ झाला. या समारंभाला या दोघांच्या घरचे सदस्य उपस्थित होते.

नक्की पाहा – Photos: लग्नाआधी कतरिनाचा पारंपरिक एअरपोर्ट लूक; राजस्थानला पोहोचलं वऱ्हाड

माध्यमांच्या वृत्तानुसार, लग्नानंतर कतरिना आणि विकी टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीचे शेजारी होणार आहेत. विकी आणि कतरिना दोघेजण लग्नानंतर राहण्यासाठी घर शोधत होते. त्यांच्या घराचा शोध संपला असून त्यांनी जुहू परिसरात असलेल्या एक आलिशान अपार्टमेंट भाडेतत्वावर घेतले आहे. हे घर पाच वर्षांसाठी भाड्याने घेतले असून त्यासाठी मोठी रक्कम दिल्याचे समजते. आठव्या मजल्यावर असलेले हे अपार्टमेंट जुलै २०२१ मध्ये भाड्याने घेतले आहे.

हेही वाचा – …तर लग्नाच्या शूटींगमधूनच विकी-कतरिना करणार १०० कोटी रुपयांची कमाई?

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी २०१७ मध्ये लग्न केले. ते भारतातील एका आलिशान घराचे मालक आहेत. वरळीतील ओंकार १९७३ या आलिशान निवासी इमारतीत हे स्टार जोडपे ३४ कोटी इतकी किंमत असलेल्या घरात राहतात.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif and vicky kaushal to reportedly become virat kohli anushka sharmas neighbour after wedding adn