Who is the Most Valuable Player in IPL 2024 : लोकप्रिय भारतीय रिॲलिटी टीव्ही क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’चा १६वा सीझन सुरू झाला आहे. अभिनेते अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या या शोमध्ये अनेक अनेकदा क्रिकेटशी संबंधित प्रश्न विचारले जातात. आता १२ ऑगस्ट रोजी ‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) च्या १६ व्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये आयपीएलशी संबंधित प्रश्नांचा समावेश होता. ज्यामध्ये होस्ट अमिताभ बच्चन यांनी सहभागी उत्कर्ष बक्षी यांना ८०,००० रुपयांसाठी आयपीएल २०२४ शी संबंधित प्रश्न विचारला. चला तर मग जाणून घेऊया हा प्रश्न काय होता आणि त्याचे उत्तर काय दिले? जाणून घ्या

अमिताभ बच्चन यांनी हॉट सीटवरील उत्कर्ष बक्षी यांना ८०,००० रुपयांसाठी विचारला होता. तो प्रश्न होता की, आयपीएल २०२४ च्या मोसमातील अष्टपैलू कामगिरीसाठी ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’ कोण होता? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी चार पर्याय देण्यात आले होते.

Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Best Web Series of 2024
२०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी, तुम्ही पाहिल्यात का ‘या’ कलाकृती?
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश

८०,००० रुपयांसाठीचा प्रश्नासाठी हे पर्याय देण्यात आले होते. मात्र, उत्कर्ष बक्षी यांना या प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते. त्यांनी लाइफलाइन घेण्याचे ठरवले आणि अमिताभ बच्चन यांना ‘ऑडियन्स पोल’ घेण्यास सांगितले. प्रेक्षकांनी ‘सी’ हा पर्याय निवडला आणि बक्षी यांना यश मिळाले. उत्तर होते सुनील नरेन, ज्याने २०१४ नंतर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआरल) ला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हेही वाचा – Buchi Babu Tournament : बुची बाबू स्पर्धा कोणाच्या नावावरून सुरू झाली? काय आहे त्यांचं योगदान? यंदा सूर्या-इशान-श्रेयस या स्पर्धेत खेळणार

आयपीएल २०२४ मधील सुनील नरेनची कामगिरी –

आयपीएल २०२४ मध्ये सुनील नरेनची कामगिरी अतिशय दमदार होती, ज्यामध्ये त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने गोलंदाजी करताना २१.६५ च्या सरासरीने १७ विकेट्स घेतल्या. याशिवाय त्याने केकेआरसाठी फिलिप सॉल्टच्या साथीने सलामी देताना ३४.८६ च्या सरासरीने आणि १८०.७४ च्या स्ट्राईक रेटने ४८८ धावा केल्या. या काळात त्याने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली.

हेही वाचा – Manu Bhaker Neeraj Chopra : ‘माझ्यात आणि नीरजमध्ये…’, मनू भाकेरने लग्नाबाबतच्या चर्चेवर सोडले मौन; म्हणाली, तो मला…

केकेआरने आयपीएल २०२४ चे जेतेपद पटकावले –

कोलकाता नाईट रायडर्सने हंगामाच्या शेवटपर्यंत दमदार कामगिरी करताना आयपीएल २०२४ च्या चमकदार ट्रॉफीवर नाव कोरले. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आणि गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली संघाने कठीण परिस्थितीत संयम राखला आणि अनेक महत्त्वाचे सामने जिंकले. या विजयाने कोलकाताला आयपीएलच्या इतिहासातील आणखी एक चमकदार ट्रॉफी मिळाली. कोलकाताने २०२४ मध्ये आयपीएलची तिसरी ट्रॉफी जिंकली. यापूर्वी केकेआरने २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.

Story img Loader