बांगलादेश विरुद्ध (IND vs BAN) दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी भारतीय-अ संघ जाहीर झाला आहे. या संघात रोहन कुन्नम्मल या केरळच्या युवा खेळाडूला देखील संधी मिळाली आहे. अभिमन्यू ईश्वरनकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. पहिला सामना २९ नोव्हेंबरपासून तर दुसरा सामना ६ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. रोहनचे नाव जास्त घेतले जात आहे, कारण तो फक्त केरळचा आहे. केरळचा संजू सॅमसन सध्या चर्चेत आहे. संघात राहूनही त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील (IND vs NZ) कोणत्याही सामन्यात प्लेइंग-११ मध्ये संधी मिळाली नाही. आजपासून दोन्ही संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे.
२४ वर्षीय रोहन कुन्नम्मलने २०२२-२३ दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत दक्षिण विभागाकडून खेळताना उत्तर विभागाविरुद्ध १४३ आणि ७७ धावा केल्या. यादरम्यान त्याने पहिल्या ७ फर्स्ट क्लास इनिंगमध्ये ४ शतके झळकावली. तसेच १०८ च्या सरासरीने ६४५ धावा केल्या आहेत.
भारतीय अ संघात निवड झाल्यानंतर रोहन म्हणाला की, अशा कामगिरीमागे खूप मेहनत दडलेली असते, पण मी ४ शतकांचा विचारही केला नव्हता. त्याने आतापर्यंत एकूण ६ प्रथम श्रेणी सामन्यांच्या ९ डावात ९६ च्या सरासरीने ७६९ धावा केल्या आहेत. त्याने ४ शतके आणि ३ अर्धशतके केली आहेत. १४३ धावांची सर्वात मोठी धावसंख्याही राहिली आहे. आपल्या आहाराबद्दल बोलताना म्हणाला की, तो मांस, चिकन किंवा मासे खात नाही. तसेत त्याच्या आवश्यक प्रथिनांचे सेवन करण्यासाठी रोज सुमारे १४ अंडी, भाज्या आणि स्प्राउट्सवर अवलंबून असतो.
रोहनचे वडील सुशील कुन्नम्मल देखील त्यांच्या मुलाच्या यशाचे श्रेय त्याच्या फिटनेसमधील सुधारणांना देतात. ते म्हणाले, ‘पूर्वी ६० किंवा ७० धावांपर्यंत पोहोचल्यावर हात थकायचे. वाढलेल्या ताकदीमुळे तो आता जास्त काळ धावा करु शकतो. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याला कधीही धावांसाठी संघर्ष करावा लागला नाही. जर त्याने ८० चेंडूपर्यंत फलंदाजी केली, तर तो बहुतेक दिवसात १०० पर्यंत पोहोचेल.
तसेच ते पुढे म्हणाले, “आम्ही आमच्या अंगणात सराव करायचो. तेव्हाही मी त्याला मैदानावर इतर संघातील ११ खेळाडू असल्याप्रमाणे खेळायला सांगायचो आणि त्या क्षेत्रानुसार खेळवायचो. मी त्याला नेहमीच सांगितले आहे की, क्षेत्ररक्षक कुठे आहेत हे पाहू नको, तर तू गॅप शोध. कदाचित, लहान वयाच्या त्या सवयीमुळे त्याला बहुतेक खेळाडूंपेक्षा जास्त वेगळा दिसून येतो.
हेही वाचा – FIFA World Cup 2022: पोर्तुगालची घानावर मात
भारतीय अ संघ –
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), रोहन कुन्नम्मल, यशस्वी जैस्वाल, यश धुल्ल, सरफराज खान, टिळक वर्मा, उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), सौरभ कुमार, राहुल चहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी, अतित सेठ