Kerala in Ranji Trophy 2024-25 Final After 47 Years: अवघ्या २ धावांची निसटती आघाडी मिळवत केरळने रणजी ट्रॉफी करंडक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तब्बल ७४ वर्षांनंतर केरळने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. अहमदाबाद इथे सुरू असलेल्या सेमी फायनलच्या लढतीत केरळच्या ४५७ धावांच्या डोंगरासमोर खेळताना गुजरातने चिवटपणे खेळ करत लढा दिला. गुजरात हा धावांचा डोंगर पार करून माफक का होईना आघाडी मिळवणार अशी चिन्हं होती. पण वादग्रस्त अशा निर्णयामुळे गुजरातचा डाव ४५५ धावांवर आटोपला आणि केरळला दोन धावांची आघाडी मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरातने प्रियांक पांचाळच्या १४८ धावांच्या खेळीच्या जोरावर ४५५ धावांची मजल मारली. प्रियांकने १८ चौकार आणि एका षटकारासह ही खेळी सजवली. आर्य देसाईने ७३ तर जयमीत पटेलने ७९ धावांची खेळी केली. गुजरात आघाडी मिळवणार असं चित्र असताना आदित्य सरवटेच्या चेंडूवर अर्झान नागवासवालाने खेळलेला चेंडू सिली पॉइंटला क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूच्या हेल्मेटला लागून हवेत उडाला. स्लिपमध्ये सचिन बेबीने झेल पूर्ण केला. नागासवालाने केलेला स्लॉग स्वीपचा प्रयत्न सिली पॉइंटला उभ्या असणाऱ्या सलमान निझारच्या हेल्मेटवर आदळला आणि रिबाऊंड होऊन आकाशात उडाला. सचिन बेबीने हा चेंडू टिपला आणि गुजरातचा डाव आटोपला. केरळतर्फे जलाज सक्सेना आणि आदित्य सरवटे यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.

गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या लढतीतही केरळने एका धावेच्या आघाडीच्या बळावर आगेकूच केली होती. त्या सामन्यात सलमान निझार आणि आणि निधीश यांनी केरळसाठी झुंजार खेळी केल्या होत्या.