Keshav Maharaj Instagram Post After PAK vs SA: शुक्रवारी चेन्नई येथे पाकिस्तान विरुद्ध विश्वचषक सामन्यात ९ षटकांमध्ये ५६ धावांची खेळी करणारा केशव महाराज आणि दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर मोहोर लावणारा खेळाडू ठरला. ५८ चेंडूत २१ धावांची गरज असताना फक्त तीन विकेट्स शिल्लक होत्या अशावेळी दक्षिण आफ्रिकेकडे खालच्या फळीत मजबूत फलंदाज नसताना पाकिस्तानसाठी विजय सोपा वाटत होता. केशव महाराज हा संघातील वरिष्ठ सदस्य असल्याने आता त्याच्यावरच दक्षिण आफ्रिकेची बाजू सांभाळण्याची जबाबदारी आली होती. त्यातच पुन्हा शाहीन आफ्रिदीने महाराजसह असलेल्या जेराल्ड कोएत्झीचा आणि हरीस रौफने लुंगी एन्गिडीचा झेल घेत दोन विकेट्स पाठोपाठ घेतल्या. पण तरीही महाराजने गड राखून ठेवला होता. केशवच्या नाबाद १० धावांच्या खेळीने दक्षिण आफ्रिकेला अवघी एक विकेट राखून पाकिस्तानवर विजय मिळवता आला.

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यानंतर केशव महाराजने विजय साजरा करत इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट केली होती. विजयी क्षणाचा फोटो पोस्ट करताना त्याने लिहिले की, “देवाचे आभार, शम्सी आणि मार्करामचा परफॉर्मन्स जबरदस्त होता, सगळ्या खेळाडूंनी हा विशेष निकाल घडवून आणला आहे. जय श्री हनुमान.”

Maharashtra assembly election 2024
लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Swami Govinddev Giri on Vote Jihad
‘निवडणुकीची तुलना धर्म युद्धाशी नको’, व्होट जिहादच्या मुद्द्यावर स्वामी गोविंददेव गिरींनी व्यक्त केलं परखड मत
Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Ajit Pawar Sabha Mohol, Ajit Pawar news,
अजित पवारांकडून करमाळ्यात आमदार संजय शिंदे यांचा प्रचार, महायुती धर्माला कोलदांडा
priyanka Gandhi
Priyanka Gandhi : भावाला दिलेलं चॅलेंज बहिणीने पूर्ण केलं; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत प्रियांका गांधींचं मोदी-शाहांना प्रतिआव्हान
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
Eknath SHinde Ravi Rana
Eknath Shinde : महायुतीत बिनसलं? शिंदे, पवारांचा रवी राणांवर संताप; मुख्यमंत्री म्हणाले, “युतीत मिठाचा खडा…”

केशव महाराज पोस्ट (PAK vs SA Keshav Maharaj)

केशव महाराजच्या या पोस्टनंतर भारतीयांनी त्याखाली भरभरून कौतुक केले आहे. तू आज दोन देशांना अभिमान वाटेल असं वागला आहेस असं म्हणत कौतुक केलं आहे. काहींनी तर यामध्ये हनुमानाचे स्टिकर्स व फोटो GIF सुद्धा शेअर केले आहेत.

हे ही वाचा<< PAK vs SA मधील ‘या’ वादात हरभजन सिंगकडून पाकिस्तानची पाठराखण! ICC ला सुनावलं, “दोन दगडांवर पाय ठेवून..”

दुसरीकडे, पाकिस्तानने आता विश्वचषकात प्रथमच सलग चार सामने गमावले आहेत आणि नेदरलँड्स आणि श्रीलंकेविरुद्धच्या दोन विजयांमुळे त्यांच्या खात्यात फक्त चार गुण झाले आहेत. या अपमानास्पद पराभवानंतर बाबर आझमने निराशा व्यक्त करत खेळाडूंचे कौतुक केले. बाबर म्हणाला की, “आम्हाला हा सामना जिंकून स्पर्धेत टिकून राहण्याची संधी होती, पण आम्ही ती गमावली. अवघ्या १० -१५ धावांचा फरक होता. आता आम्ही आमच्या पुढील तीन सामन्यांमध्ये आमचा सर्वोत्तम प्रयत्न करू तीन सामन्यांनंतर आम्ही कुठे उभे आहोत हे लक्षात येईल. ” पाकिस्तानचा पुढील सामना हा ३१ ऑक्टोबरला बांगलादेशच्या विरुद्ध बंगळुरूमध्ये होणार आहे.