Keshav Maharaj Instagram Post Viral Bat Photo: चेन्नई येथे २७ ऑक्टोबरला रंगलेल्या पाकिस्तान विरुद्ध सामन्यात दक्षिण आफ्रिकेने एका विकेटच्या फरकाने विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानने २७१ धावा केल्या होत्या. चेपॉकच्या मैदानात विश्वचषकातील बलाढ्य संघ दक्षिण आफिकेसाठी २७१ धावांचे लक्ष्य सहज गाठता येण्यासारखे होते. त्यानुसार धावांचा पाठलाग करताना ४० ओव्हर्सपर्यंत दक्षिण आफ्रिकेचा संघ उत्तम स्थितीत दिसत होता. पण जेव्हा एडन मार्करामने ४२ व्या षटकात लेग-स्पिनर उसामा मीरच्या चेंडूवर अनावश्यक शॉट खेळला तेव्हा खेळ पालटायला सुरुवात झाली. तेव्हा मार्कराम ९१ धावांवर बाद झाला ज्यामुळे त्याचे शतक तर हुकलेच पण दक्षिण आफ्रिकेवर सुद्धा दबाव निर्माण झाला. अशा अखेरीस ५८ चेंडूत २१ धावांची गरज असताना फक्त तीन विकेट्स शिल्लक होत्या व तेव्हा केशव महाराजने दक्षिण आफ्रिकेचा गड राखून महत्त्वाचा विजय मिळवून दिला.

दक्षिण आफिकेच्या विजयानंतर स्वतः केशवने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट करून आनंद व्यक्त केला आहे. यातील एका फोटोमध्ये त्याच्या हातातील बॅट पाहून नेटकरी अत्यंत आनंदून गेले आहेत. केशवच्या बॅटवर ग्रीपच्या खालीच हिरव्या रंगात मोठा ओम कोरलेला आहे. या मुळे केशवची धार्मिक बाजू पाहून नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे. शिवाय या पोस्टमध्ये सुद्धा त्याने कॅप्शनमध्ये जय श्री हनुमान लिहून भारतीय चाहत्यांची संख्या वाढवली आहे.

Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे

केशव महाराज इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, हा फोटो व्हायरल पोस्ट केल्यावर त्यावर अनेक भारतीयांनी कमेंट करून केशव महाराजच्या बॅटवर ओम चिन्ह पाहून खूप आनंद झालं असं म्हंटलं आहे. आज तू एकाच वेळी दोन्ही देशांना अभिमान वाटेल असा खेळला आहेस असेही काहींनी लिहिले आहे.

हे ही वाचा<< आज AUS vs NZ चा निकाल ठरवू शकतो पाकिस्तानचे भविष्य; बाबर आझमचा संघ टॉप ४ मध्ये पोहोचण्याचं गणित पाहा

केशव महाराज हा मूळचा भारतीय वंशाचा खेळाडू असून केशवचे वडील आत्मानंद महाराज हेही क्रिकेटपटू होते. दक्षिण आफ्रिकेतल्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ते खेळायचे पण देशासाठी खेळू शकले नाहीत. केशवच्या क्रिकेट आवडीला त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्याची पत्नी लेरीशा ही एक कथ्थक नर्तिका आहे. दक्षिण आफ्रिकेतून खेळणारा पण मानाने भारतीय असणारा केशव आता कालच्या विजयानंतर नेटकऱ्यांच्या आवडीचा ठरत आहे.