Keshav Maharaj Instagram Post Viral Bat Photo: चेन्नई येथे २७ ऑक्टोबरला रंगलेल्या पाकिस्तान विरुद्ध सामन्यात दक्षिण आफ्रिकेने एका विकेटच्या फरकाने विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानने २७१ धावा केल्या होत्या. चेपॉकच्या मैदानात विश्वचषकातील बलाढ्य संघ दक्षिण आफिकेसाठी २७१ धावांचे लक्ष्य सहज गाठता येण्यासारखे होते. त्यानुसार धावांचा पाठलाग करताना ४० ओव्हर्सपर्यंत दक्षिण आफ्रिकेचा संघ उत्तम स्थितीत दिसत होता. पण जेव्हा एडन मार्करामने ४२ व्या षटकात लेग-स्पिनर उसामा मीरच्या चेंडूवर अनावश्यक शॉट खेळला तेव्हा खेळ पालटायला सुरुवात झाली. तेव्हा मार्कराम ९१ धावांवर बाद झाला ज्यामुळे त्याचे शतक तर हुकलेच पण दक्षिण आफ्रिकेवर सुद्धा दबाव निर्माण झाला. अशा अखेरीस ५८ चेंडूत २१ धावांची गरज असताना फक्त तीन विकेट्स शिल्लक होत्या व तेव्हा केशव महाराजने दक्षिण आफ्रिकेचा गड राखून महत्त्वाचा विजय मिळवून दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा