इंग्लंडचा संघाने बुधवारपासून आपला नवीन क्रिकेट हंगाम सुरू केला आहे. इंग्लंड न्यूझीलंडविरुद्ध कसोटी २ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर त्यांचा सामना टीम इंडियाशी होईल. दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन ने संघातील मोठ्या उणीवा उघडकीस आणल्या आहेत. तसेच पीटरसनने इंग्लंड संघाला सल्ला दिला. कोणत्याही परिस्थितीत इंग्लंडला टीममध्ये रवींद्र जडेजासारखा खेळाडू शोधावा लागेल. तसेच पीटरसनने इंग्लंडमधील प्रत्येक नवोदित क्रिकेटपटूला रवींद्र जडेजासारखे बनण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.
केव्हिन पीटरसन एका लेखात म्हणाला, “आतापर्यंत इंग्लंड जडेजासारखा डावखुरा फिरकी गोलंदाज सापडला नाही जो फलंदाजी देखील करू शकेल. इंग्लंडला कोणत्याही परिस्थितीत टीममध्ये रवींद्र जडेजासारखा खेळाडू शोधावा लागेल. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने कसोटी, एकदिवसीय आणि टी – २० मध्ये केलेली कामगिरी इंग्लंडसाठी समस्या आहे. मात्र, या समस्येवर इंग्लंडला उपाय शोधावा लागेल. जर जडेजा सारखा खेळाडू इंग्लंडला मिळाला तर त्यापेक्षा मौल्यवान काहीचं नाही”
हेही वाचा – क्रिकेटच्या पंढरीत न्यूझीलंडच्या फलंदाजाचं शतक, पण चर्चा गांगुलीची!
रवींद्र जडेजासारखे बना, पीटरसनचा नवोदित खेळाडूंना सल्ला
केव्हिन पीटरसनने इंग्लंडच्या नवोदित खेळाडूंना रविंद्र जडेजा पाहून शिकण्याचा सल्ला दिला. ‘जडेजाला विसरू नका कारण तो सुपरस्टार आहे. जर आपण हे केले तर इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटपटू म्हणून आपली कारकीर्द खूपच लांब असेल. केव्हिन पीटरसनने इंग्लंडचे दोन फिरकीपटू जॅक लीच आणि डोम बेसवर प्रश्न उपस्थित केले. पीटरसन म्हणाला, लीच आणि बेस हे दोघेही कसोटी फिरकीपटू नाहीत. मी दोन वर्षांपूर्वी म्हणालो होते की, लीच कसोटी सामने जिंकण्यासाठी ओळखला जाणार नाही, दुर्दैवाने मी बरोबर सिद्ध झालो. तो कसोटी सामने जिंकू शकत नाही. तो मॉटी पानसेर आणि ग्रॅमी स्वानसारखा नाही. जर इंग्लंड फक्त वेगवान गोलंदाजांसोबत मैदानात उतराला तर मी काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ते समजू शकेल. इंग्लंडला कोणत्याही किंमतीत डावखुरा फिरकीपटू शोधावा लागेल, अन्यथा संघात कमकुवतपणा कायम राहील.