इंग्लंडचा माजी फलंदाज केवीन पीटरसन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक झाला आहे. मात्र इंग्लंडऐवजी आपल्या जन्म ठिकाणच्या देशाकडून म्हणजेच दक्षिण आफ्रिकेद्वारे पुनरागमन करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पीटरसनला २०१३-१४ च्या अॅशेल मालिकेनंतर इंग्लंड संघातून डच्चू देण्यात आला होता. २०१८ मध्ये तो आफ्रिकेकडून खेळण्यासाठी पात्र होऊ शकतो. तो म्हणाला, ‘‘मला अजूनही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळण्याची इच्छा आहे व त्याकरिता आवश्यक असणारी क्षमताही माझ्याकडे आहे. जर माझी इच्छा पूर्ण झाली तर मला स्वप्न साकार झाल्याचे समाधान मिळेल. आफ्रिकेकडून खेळण्यासाठी मला आणखी एक वर्ष वाट पहावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय सामने हे प्रत्येक खेळाडूसाठी हवीहवीशी गोष्ट असते. मी गेली दोन वर्षे त्यापासून दूर राहिलो आहे. अर्थात जर पुन्हा इंग्लंडने मला संधी दिली तर ती संधीदेखील मी सोडणार नाही.’’
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेद्वारे पीटरसनचे पुनरागमन?
इंग्लंडचा माजी फलंदाज केवीन पीटरसन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक झाला आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
आणखी वाचा
First published on: 11-04-2016 at 00:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kevin pietersen considers playing for south africa