Kevin Pietersen is available for Batting Coach : टी-२० विश्वचषक २०२४ च्या जेतेपदानंतर राहुल द्रविड यांचा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. यानंतर गौतम गंभीरने पदभार स्वीकारला. यानंतर मॉर्ने मॉर्केलला गोलंदाजी प्रशिक्षक, अभिषेक नायर आणि रायन टेन देशकाटे यांना सहायक प्रशिक्षक आणि टी दिलीप यांना क्षेत्ररक्षण प्रशिक्षक नियुक्त आले. गंभीरच्या कोचिंग स्टाफमध्ये फलंदाजी प्रशिक्षक नाही. अशा स्थितीत बीसीसीआय नवीन फलंदाजी प्रशिक्षक नेमण्याचा विचार करत आहे. अशात केव्हिन पीटरसनने केले ट्वीट चर्चेत आहे.
वास्तविक, गौतम गंभीरने पदभार स्वीकारल्यापासून भारतीय संघाची कामगिरी काही विशेष झालेली नाही. गंभीरच्या देखरेखीखाली टीम इंडियाने एक टी-२० मालिका, एक वनडे मालिका आणि तीन कसोटी मालिका खेळल्या आहेत, ज्यामध्ये खराब निकाल मिळाले आहेत. अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. या दौऱ्यात भारतीय फलंदाजांची निराशा झाली. त्यामुळे बीसीसीआय आता कोचिंग स्टाफमध्ये फलंदाजी प्रशिक्षक नेमण्याच्या तयारीत आहे.
भारताचा फलंदाजी प्रशिक्षक होण्यासाठी केव्हिन पीटरसन उत्सुक –
याबाबतचा क्रिकबझचा हा अहवाल समोर येताच सोशल मीडियावर तो वाऱ्यासारखा पसरला. अशा स्थितीत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसननेही प्रतिक्रिया दिली आणि स्वत:ला भारतीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षक होण्यास उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. पीटरसनने हे गमतीने म्हटले आहे की खरंच त्याची टीम इंडियाचा फलंदाजी प्रशिक्षक होण्याचे इच्छा आहे, हे अजून स्पष्ट झालेलेल नाही.
सितांशु कोटकांचे नाव निश्चित होण्याची शक्यता –
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात असे म्हटले आहे की बीसीसीआय सितांशु कोटक यांना टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करू शकते. कोटक सध्या भारत अ संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांच्या देखरेखीखाली भारत अ संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. याशिवाय, राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत ऑगस्ट २०२३ मध्ये आयर्लंडला गेलेल्या भारतीय संघाचे ते मुख्य प्रशिक्षक होते. या मालिकेत जसप्रीत बुमराहने संघाचे नेतृत्व केले होते.