डाव्या पायाच्या पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे इंग्लंडचा तडाखेबंद फलंदाज केव्हिन पीटरसन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या अॅशेस कसोटीत खेळणार नसल्याचे संघाच्या प्रवक्त्याने तिसऱ्या दिवसअखेर सांगितले.
‘‘केव्हिनच्या डाव्या पोटरीला दुखापत झाली असून त्यावर त्याला उपचार घ्यावे लागणार आहेत. त्यामुळेच त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षणाला उतरता येणार नाही. तिसऱ्या कसोटी सामन्यापर्यंत त्याच्या दुखापतीचे आम्ही निरीक्षण करू आणि त्यानंतर त्याच्या समावेशाचा निर्णय घेऊ,’’ असे इंग्लंड संघाच्या प्रवक्त्याने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jul 2013 रोजी प्रकाशित
दुखापतीमुळे पीटरसनची दुसऱ्या कसोटीतून माघार
डाव्या पायाच्या पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे इंग्लंडचा तडाखेबंद फलंदाज केव्हिन पीटरसन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या अॅशेस कसोटीत खेळणार नसल्याचे संघाच्या प्रवक्त्याने तिसऱ्या दिवसअखेर सांगितले.

First published on: 21-07-2013 at 07:14 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kevin pietersen out of rest of second ashes 2013 test