Harshit Rana praises by Kevin Pietersen : इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० दरम्यान कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर त्याने राणाच्या गोलंदाजीचेही कौतुक केले. भारतीय डावाच्या शेवटच्या षटकात शिवम दुबेच्या हेल्मेटला चेंडू लागल्याने तो दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी आला नाही. त्याच्या जागी हर्षित राणा मैदानात उतरला आणि त्याने धुमाकूळ घातला. राणाने ४ षटकात ३३ धावा देत तीन विकेट्स घेतले आणि इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरचाही झेल टिपला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केविन पीटरसनकडून हर्षित राणाचे कौतुक –

केविन पीटरसन सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाला, “या सगळ्यात हर्षित राणाची चूक नाही. त्याची गोलंदाजी चमकदार होती. मला वाटते, त्याने आपली कौशल्य खूप चांगल्या प्रकारे दाखवले. त्याने ज्या पद्धतीने काही फलंदाजांचे मूल्यांकन केले, ते चमकदार आहे. त्याने ज्या पद्धतीने परिस्थितीचे आकलन केले आणि गोलंदाजी ते खरंच खास होते. अनेक प्रसंगी त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना चकित करत सामन्याला कलाटणी देत भारताला विजयाकडे नेले.”

हर्षित राणाने सामन्याला दिली कलाटणी –

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक हरल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर टीम इंडियाने शिवम दुबे आणि हार्दिक पंड्याच्या अर्धशतकांच्या जोरावर १८१ धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना खातेही उघडता आले नाही, तर संजू सॅमसनही एक धावा काढून बाद झाला. एकवेळ भारताने ७९ धावांवर ५ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर हार्दिक आणि दुबे यांनी ५३-५३ धावांची खेळी करत संघाला या धावसंख्येपर्यंत नेले.

भारताच्या १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात दमदार झाली. पॉवरप्लेमध्ये संघाने १ गडी गमावून ६२ धावा फलकावर लावल्या होत्या, पण फिरकी गोलंदाज आक्रमणावर येताच पाहुणा संघ बॅकफूटवर गेला. यानंतर हर्षित राणाने तीन विकेट्स घेत उर्वरित काम पूर्ण केले. इंग्लंडला पूर्ण २० षटकेही खेळता आली नाहीत. संपूर्ण संघ १९.४ षटकांत १६६ धावांवर गारद झाला. यानंतर शिवम दुबेला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kevin pietersen praises harshit rana bowling as a concussion substitute during ind vs eng 4th t20i at pune vbm