आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेली असली तरी पुन्हा एकदा देशाकडून खेळायची इच्छा इंग्लंडचा तडफदार फलंदाज केव्हिन पीटरसनने व्यक्त केली आहे.
‘‘मला इंग्लंडकडून पुन्हा खेळायला आवडेल, पण त्यासाठी काही गोष्टींमध्ये बदल व्हायला हवा. येत्या वर्षभरात विश्वचषक जिंकण्याची आणि अ‍ॅशेस परत मिळवण्याची इंग्लंडला संधी आहे. संघाबरोबर चषक उंचावणे हे संस्मरणीय असते आणि येत्या वर्षभरात ही स्वप्ने सत्यात उतरू शकतात,’’ असे पीटरसनने सांगितले.

Story img Loader