Khaleel says Mahi bhai is not my friend elder brother : भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनीचा खेळाडूंमध्ये मोठा चाहतावर्ग आहे. काहीजण युवा क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीला आपला मोठा भाऊ मानतात तर काहीजण त्याला आई-वडिलांप्रमाणे मानतात. अनेक प्रसंगी युवा क्रिकेटपटूंनी महेंद्रसिंग धोनीसोबतचे त्यांचे खास नाते उघडपणे व्यक्त केले आहे. धोनीने आपल्या नेतृत्त्वाखाली भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. आता अशा महान धोनीबद्दल युवा वेगवान गोलंदाज खलील अहमदने मोठे वक्तव्य केले आहे.

खलील अहमदने एमएस धोनी टीम इंडियाचा कर्णधार असताना भारतासाठी पदार्पण केले होते. खलीलने आशिया कप २०१८ मध्ये हाँगकाँगविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एकदा न्यूझीलंड दौऱ्यावर असताना धोनीने खलील अहमदला पुष्पगुच्छ दिला होता, ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हायरल फोटोबद्दल बोलताना खलीलने धोनीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्याने सांगितले की धोनीमुळे त्याचे भारतासाठी पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्याचे स्वप्न साकार झाले.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : ‘अजित पवारांना राखी बांधणार का?’ विचारताच सुप्रिया सुळे हसल्या आणि म्हणाल्या, “मी आज..”
Harbhajan Singh Statement on Rohit Sharma MS Dhoni
Harbhajan Singh: “धोनी खेळाडूंशी बोलत नाही, तर रोहित…” भारतीय कर्णधारांवर हरभजन सिंगचे वक्तव्य, सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून ‘या’ खेळाडूला पसंती
geeta phogat husband pawan saroha criticizes vinesh phogat
Vinesh Phogat : ‘देव तुला सद्बुद्धी देवो…’, मेहुणा पवन सरोहा विनेशवर का संतापला? तर बहीण गीता म्हणाली, ‘कर्माचीच फळं…’
Rohit Sharma Chills With Friends Abhishek Nayar Dhawal Kulkarni Shared Photo
Rohit Sharma: “आमचं असंच चालतं…” रोहितचा धवल, नायरसह कॅफेमध्ये हटके सेल्फी, मराठमोळ्या मित्राच्या कॅप्शनने वेधलं लक्ष
Nitin Gadkari, Wardha, Raksha Bandhan, charity, Smita Kolhe Ties Rakhi to nitin gadkari
बहिणीने राखी बांधली; पण मंत्री असलेल्या भावाकडे ओवाळणीसाठी पैसेच नव्हते, मग…
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप

आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना खलील अहमद म्हणाला, “आम्ही न्यूझीलंडमध्ये होतो, माही भाईच्या चाहत्यांनी त्याला एक पुष्पगुच्छ दिला होता, जो त्याने मला दिला. त्यावेळी या खास क्षणाचा फोटो एका चाहत्याने काढला होता, जो व्हायरल खूप झाला होता. ते माझ्यासाठी खूप संस्मरणीय होते. माही भाई माझा मित्र नाही, तो माझा मोठा भाऊही नाही, पण तो माझा गुरु आहे.”

हेही वाचा – Deepti Sharma : दीप्ती शर्माने खणखणीत षटकार ठोकून The Hundred मध्ये संघाला पहिल्यांदाच बनवले चॅम्पियन, पाहा VIDEO

खलील अहमद पुढे म्हणाला, “लहानपणापासून माझे भारतासाठी पहिले षटक टाकणारा गोलंदाज बनण्याचे स्वप्न होते. कारण मी झहीर खानला असे करताना पाहिले होते. आशिया कपमध्ये माही भाईने मला पहिले षटक टाकण्यास सांगितले. त्यावेळी मी इतक्या वेगाने संघापासून दूर पळालो. कारण मला वाटले की जर मी विलंब केला, तर माही भाईला वेळ मिळेल आणि कदाचित त्याचे मत बदलेल. म्हणून मी पटकन चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी गेलो.”