Khel Ratna To Manu Bhaker And D Gukesh : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ ची घोषणा केली आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यामध्ये २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकेर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग आणि पॅरा अथलीट प्रवीण कुमार या चार क्रीडापटूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, हे पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी केंद्र सरकारकडून क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारच्या यादीत नेमबाज मनू भाकेरचे नाव नसल्याने मोठा वाद झाला होता. पण, आज जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये मनू भाकेरला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला आहे.

हे ही वाचा : IND vs AUS: ऑस्ट्रेलियाकडून ३१ वर्षीय खेळाडू सिडनी कसोटीत करणार पदार्पण, मार्शला दाखवला बाहेरचा रस्ता; कोण आहे हा नवा अष्टपैलू?

अवघ्या २२ वर्षांच्या मनू भाकेरने ऑगस्टमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत दोन कांस्य पदके जिंकली होती. यासह मनू एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारताची पहिली ऍथलीट बनली आहे. दरम्यान याच ऑलिम्पिक स्पर्धेत हमरनप्रीत सिंगने त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय हॉकी संघाला सलग दुसरे कांस्यपदक मिळवून दिले होते.

दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचे १८ वर्षांच्या डी गुकेशने जेतेपद पटकावले होते. तो ही स्पर्धा जिंकणारा आतापर्यंतचा सर्वात तरुण बुद्धीबळपटू आहे. याबरोबर त्याने गेल्या वर्षी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकण्यात मदत केली होती.

हे ही वाचा : “खेळाडू आणि कोचमधील वाद…”, कोच गंभीरचं सिडनी कसोटीपूर्वी समोर आलेल्या ड्रेसिंग रूममधील वादावर मोठं वक्तव्य

पॅरा अथलीट प्रवीण कुमार

२०२४ च्या खेलरत्न पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथे नाव पॅरा अथलीट प्रवीण कुमार याचे आहे. प्रवीण कुमारने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उच्च उडी या खेळ प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याला पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये टी ६४ चॅम्पियन म्हणून गैरविण्यात आले होते. ज्या खेळाडूंना गुडघ्याच्या खाली एक किंवा दोन्ही पाय नसतात ते टी ६४ प्रकारच्या खेळात सहभागी होत असतात.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khel ratna award to manu bhaker gukesh d harmanpreet singh praveen kumar aam