अलाहिदा डावापर्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघाने ठाण्याच्या विहंग स्पोर्ट्सवर २८-२७ अशी मात केली आणि पुणे महापौर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या अजिंक्यपदासह एक लाख रुपयांची कमाई केली.
राजा धनराज गिरजी प्रशालेच्या मैदानावर झालेला अंतिम सामना विलक्षण चुरशीचा झाला. पूर्वार्धात दोन्ही संघ ८-८ असे बरोबरीत होते. उत्तरार्धात दोन्ही संघांनी प्रत्येकी अकरा गडी टिपले. त्यामुळे १९-१९ अशी बरोबरी झाली. दुसऱ्या आक्रमणात विहंग स्पोर्ट्सच्या मनोज पवारने शेवटची दहा सेकंद बाकी असताना नवमहाराष्ट्रच्या मुकेश गोसावी याला सुरेख टिपले व सामना बरोबरीत
ठेवला.
अलाहिदा डावात नवमहाराष्ट्रने नऊ गडी बाद केले. संरक्षणात त्यांच्या अक्षय गणपुले या कुमार गटातील खेळाडूने केलेली २ मिनिटांची पळती निर्णायक ठरली. त्याने पहिल्या डावात १ मिनिट, दुसऱ्या डावात १ मि.२० सेकंद पळती केली. त्याच्या संघाकडून मुकेश गोसावी याने १ मि.१० सेकंद, १ मि.२० सेकंद, १ मिनिट तसेच सहा गडी बाद करीत अष्टपैलू खेळ केला. कुणाल वाईकर व संदीप पाटील यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले. विहंग संघाकडून रंजन शेट्टी याने २ मिनिटे, १ मि., दीड मिनिटे तसेच पाच गडी अशी अष्टपैलू कामगिरी केली. मनोज पवारने सहा तर समीर राठोडने चार गडी टिपले.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स संघाने मुंबईच्याच सह्य़ाद्री संघावर १४-१३ असा निसटता विजय मिळविला.
कुणाल वाईकर (सवरेत्कृष्ट अष्टपैलू), अक्षय गणपुले (उत्कृष्ट संरक्षक), रंजन शेट्टी (उत्कृष्ट आक्रमक) यांना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. स्पध्रेचा पारितोषिक वितरण समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला.
नाशिक, कोल्हापूरची विजयी सलामी
पुरुष गटात नाशिक आणि कोल्हापूरने विजयी सलामी नोंदवली. सोलापूर आणि नाशिकच्या संघांमध्ये अतिशय चुरशीचा खेळ झाला. त्यामध्ये नाशिक संघाने १ गुण व २ मिनिटे राखून विजय मिळवला. या गटातील कोल्हापूर विरुद्ध नागपूर संघाचा सामना मात्र एकतर्फी झाला. त्यात कोल्हापूरचा संघ १ डाव व १० गुणांनी विजयी झाला.
महिलांच्या गटात अहमदनगर संघाने चंद्रपूरच्या संघावर १ डाव ५ गुणांनी मात केली. किशोर गटामध्ये कोल्हापूर संघाने रत्नागिरी संघावर १३ विरुद्ध ७ गुणांनी विजय मिळवला, तर सांगलीच्या संघाने पुण्यावर १ गुण व ५ मिनिटे, ५० सेकंद राखून मात केली. किशोरी गटात मुंबई उपनगर संघाने कोल्हापूरचा १ डाव ७ गुणांनी (१८-११) आणि पुण्याच्या संघाने यवतमाळचा १ डाव ११ गुणांनी (१७-६) पराभव केला.
ऑलिम्पिक भवन उभारणार – सामंत
राज्यातील विविध क्रीडा संघटनांचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी पुण्याजवळ बालेवाडी येथे ऑलिम्पिक भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा राज्यमंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा