क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि पुणे व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, ठाणे संघांनी विजयी आगेकूच केली. किशोर गटात पुण्याने सोलापूर संघावर १०-९ असा निसटता विजय मिळवला. पुण्याकडून वृषभ वाघने ३ आणि २ मिनिटे संरक्षण केले. किशोरी गटात अहमदनगरने पुण्यावर १०-८ असा १.३० मिनिटे राखून मात केली. मयुरी मुत्यालने २.५० मिनिटे संरक्षण करताना ३ गडी बाद केले. प्रगती कंठाळेने २.५० मिनिटे संरक्षण केले. महिलांमध्ये मुंबई संघाने जळगाव संघाला १२-८ असे एक डाव आणि ४ गुणांनी नमवले. शुभांगी जाधवने ३.४० मिनिटे संरक्षण केले. दर्शना सकपाळने २.४० मिनिटे संरक्षण करताना ३ गडी बाद केले. ठाणे संघाने पुजा आणि प्रियांका भोपे भगिनींच्या शानदार खेळाच्या जोरावर जळगाव संघाचा १०-५ असा एक डाव आणि ५ गुणांनी पराभव केला. पुरुष गटात उपनगरने अमरावती संघावर १५-८ असा एक डाव आणि ७ गुणांनी विजय मिळवला. किरण कांबळेने ६ गडी बाद केले. अनिकेत पोटेने १.३० आणि ४.१० मिनिटे संरक्षण करताना ३ गडीही बाद केले. यजमान नाशिक संघाने नागपूरवर एक डाव आणि ४ गुणांनी मात केली.
सांगलीने सोलापूर संघावर १५-१२ असा एक डाव आणि ३ गुणांनी विजय मिळवला. नरेश सावंत आणि तानाजी सावंत यांनी प्रत्येकी २.१० मिनिटे संरक्षण केले. रमेश सावंतने ४ गडी बाद केले. कोल्हापूरने नागपूरचा १६-९ असा एक डाव आणि ७ गुणांनी धुव्वा उडवला. उमेश सातपुतेने ४.४० मिनिटे संरक्षण करताना २ गडी बाद केले. प्रशांत शेळकेने ५ गडी बाद केले.
नाशिकची बोहनी
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि पुणे व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, ठाणे संघांनी विजयी आगेकूच केली.
First published on: 28-03-2015 at 02:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kho kho competition